स्वातंत्र्यसैनिकांचे बलिदान सदैव स्मरणात ठेवा – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

– राष्ट्रनिर्माण समितीच्या वतीने अखंड भारत संकल्प दिन

नागपूर :- आज आपण भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतोय. पण ७५ वर्षांपूर्वी जेव्हा देश पारतंत्र्यात होता तेव्हा हजारो स्वातंत्र्यसैनिकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले. त्यांचे बलिदान सदैव स्मरणात ठेवूनच भारत सदैव प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज (सोमवार) केले.

राष्ट्र निर्माण समितीच्या वतीने सक्करदरा चौक येथे अखंड भारत संकल्प दिन व सामूहिक वंदेमातरम् गायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला आमदार प्रवीण दटके, भाजपचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे, माजी आमदार नागो गाणार, राष्ट्र निर्माण समितीचे अध्यक्ष ईश्वर गिरडे, देवेंद्र दस्तुरे, डॉ. श्रीरंग वराडपांडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.यावेळी भारतीय वायू दलाचे निवृत्त एअर मार्शल (अतिविशिष्ट सेवा मेडल) प्रशांत खांडेकर, नौदलाचे निवृत्त व्हाईस एडमिरल (अतिविशिष्ट सेवा मेडल) किशोर ठाकरे आणि भारतीय थल सेनेचे निवृत्त कर्नल मनीष किन्हीकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. ना. गडकरी म्हणाले, ‘स्वातंत्र्य मिळाले तेव्हा आपला देश सामाजिक, आर्थिक अनेक बाबतीत मागासलेला होता. पण आज आपल्या देशाने चंद्रापर्यंत मजल मारली आहे. देशाच्या सीमेवर आपले सैन्य डोळ्यात तेल घालून देशाचे रक्षण करीत आहे, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर आपण जगात स्वतःला सिद्ध केले आहे.

आज इथे ज्या तिन्ही दलाच्या अधिकाऱ्यांचा सत्कार झाला, त्यांनी देशासाठी फार मोठे योगदान दिले आहे. त्यामुळे राष्ट्र निर्माण समितीने त्यांचा सत्कार केला याचा विशेष आनंद आहे.’ आता भारताला जगात क्रमांक एकचा देश बनविण्याचा संकल्प आपण सोडला आहे. ज्ञानाचा उपयोग करून देशाला जागतिक महाशक्ती करायचे आहे. देशात सामाजिक समरसता निर्माण करायची आहे, असेही ते म्हणाले. यावेळी यांचीही उपस्थिती होती.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

तरुणांच्या नवसंकल्पना साकारण्यासाठी संपूर्ण सहकार्य करणार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Tue Aug 15 , 2023
– नागपुरातील पहिल्या पेटेंट महोत्सवात 1224 नवसंकल्पना सादर नागपूर :-  नवसंल्पनांच्या माध्यमातून लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवू शकेल अशा सर्व संकल्पना प्रत्यक्ष साकार करण्यासाठी तसेच या संकल्पना स्टार्टअपमध्ये रुपांतरित करण्याच्यादृष्टीने शासनतर्फे संपूर्ण सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नव संशोधकांना दिली. व्हिजन नेक्स्ट संस्थेच्यावतीने आयोजित बौद्धिक संपदा एकस्व (पेटंट) महोत्सवातील प्रतिनिधिक संशोधनकर्त्यांचा सत्कार येथील कविवर्य सुरेश भट […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com