कामठी शहराच्या विकासासाठी सदैव तत्पर-आमदार चंद्रशेखर बावनकुळे.

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी

-नाल्या काठावरील घरांना लवकरच घरे मिळणार

कामठी ता प्र 14:-सन 2004 पासून कामठी शहराचा आमदार म्हणून लोकप्रितिनिधीची भूमिका साकारत असताना कामठी शहरात कौमी एकतेचे वातावरण कायम आहे ज्याचा सार्थ अभिमान आहे.कामठी शहरातील नागरिकांनी निवडणुकीत आपल्या मतदानाचा योग्य वापर करून मला सतत निवडून दिल्यामुळे आमदार पदी कायम असून त्यांचा हक्काच्या विकासकामे घडवून आणणे ही माझी प्राथमिक जवाबदारी आहे त्यामुळे कामठी शहराला कोटीपेक्षाही अधिक शासकीय निधीं देऊन शहरात विकासाची गंगा खेचून आणतो आणि कामठी शहराच्या विकासासाठी सदैव तत्पर राहणार असल्याचा विश्वास व्यक्त करीत दरवर्षी पावसाळ्यात नाल्या काठावरील घरात पावंसाचे पाणी शिरल्याने अतोनात नुकसान होते तेव्हा हा प्रसंग टाळावा म्हणून नाल्या काठावरील घरांचे सर्वेक्षण करून त्यांना मालकी हक्काचे घरे देणार असल्याचे मौलिक प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष व विधानपरिषद सदस्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज 14 मे ला कामठी नगर परिषद च्या वतीने आयोजित स्थायी मालकी पट्टे वितरण, बचत गटांना कर्ज वितरण तसेच प्रधानमंत्री स्वनिधी योजने अंतर्गत लाभार्थ्यांना कर्ज वितरण कार्यक्रमात व्यक्त केले.

यावेंळी व्यासपीठावर आमदार टेकचंद सावरकर,खासदार कृपाल तुमाणे,माजी जी प सदस्य अनिल निधान, भाजप पदाधिकारी अजय अग्रवाल,भाजप शहराध्यक्ष संजय कनोजिया, माजी नगरसेविका वैशाली मांनवटकर,माजी नगरसेविका संध्या रायबोले,माजी नगरसेवक लालसिंग यादव,माजी नगरसेवक कपिल गायधने, डॉ संदीप कश्यप, संदीप इटकेलवार,लाला खंडेलवाल,उज्वल रायबोले,प्रमोद वर्णम,लालू यादव, पंकज वर्मा, विजय कोंडुलवार आदी उपस्थित होते.

प्रधानमंत्री घरकुल योजने अंतर्गत कामठी शहरातील 17 हजार 625 घरे स्थायी पट्ट्या अभावी घरकुल योजने पासून वंचित होते त्यासाठी आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अथक प्रयत्नांना मिळालेल्या यशामुळे राज्य शासनाने 1 कोटी 63 लक्ष रुपये चा निधी कामठी नगर परिषद ला दिल्यामुळे नागरिकांना एकही रुपया न भरता घराची मोजणी होऊन स्थायी पट्ट्याचा लाभ मिळाला आहे.यातील पहिल्या टप्प्यात 6133 स्थायी पट्टे मंजूर करण्यात आले असून आज 1460 नागरिकांना स्थायी पट्टे वितरित करण्यात आले.30 मे च्या आत पट्टे वितरित करायचे असून स्थायी पट्टे धारकांचे कामगार कार्ड नोंदणी करून त्यांना कामगार घरकुल योजना चे 2 लक्ष रुपये तसेच प्रधानमंत्री घरकुल योजना चे लक्ष रुपये असा चार लक्ष रुपयांचा निधीं प्राप्त होईल व लाभार्थ्यांचे सोयीचे घर बनेल.त्यासोबतच घरकुल साठी असलेल्या नमो योजना ,शबरी योजना, रमाई घरकुल योजनेचा लाभ देऊन घरकुल लाभार्थ्यांना लाभ मिळवून द्या.तसेच शहराच्या विकासासाठी लोकप्रतिनिधीसह येथील शासकीय अधिकाऱ्यांची मोलाची भूमिका असते तेव्हा या विकासकांमात अडथळा ठरवून कुणीही अधिकाऱ्यांना धमकीवजा करीत असतील तर त्यांच्यावर कडक कारवाही करण्यात येईल असा इशारा सुद्धा आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला .तसेच प्रधानमंत्री स्वनिधी योजने अंतर्गत कर्ज वितरण करण्यात कामठी शहर हे महाराष्ट्रातील पाहिले शहर असल्याचे जाहीर केले.तर याप्रसंगी खासदार कृपाल तुमाणे,आमदार टेकचंद सावरकर यांनी समयोचित असे मार्गदर्शन केले.

कार्यक्रमात स्थायी पट्टे लाभार्थी,प्रधानमंत्री स्वनिधी योजनाचे लाभार्थी तसेच पंडित दीनदयाळ योजनेचे महिला बचत गटांना कर्ज वितरण करण्यात आले.कार्यक्रमात मोठ्या संख्येत नागरिकांची उपस्थिती होती.कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडला असून कार्यक्रमाचे संचालन प्रकल्प अधिकारी प्रदीप तांबे यांनी केले तर आभार प्रदर्शन विशाल गजभिये यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कामठी नगर परिषद प्रशासक विराणी, तहसीलदार अक्षय पोयाम, मुख्याधिकारी संदीप बोरकर , प्रदीप भोकरे, विजय मेथीयां, प्रदीप तांबे,विशाल गजभिये आदींनी मोलाची भूमिका साकारली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

जत्रा योजने अंतर्गत भूगाव येथे शिबिर

Sun May 14 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी :- जत्रा शासकीय योजनांची सर्वसामान्यांच्या विकासाची’ या योजनेअंतर्गत सामाजिक न्याय विभाग व समाज कल्याण नागपूर डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टि ) पुणे यांच्यावतीने तालुक्यातील भुगाव ग्रामपंचायत मध्ये नुकतेच जत्रा शिबिर घेण्यात आले होते. या शिबिरामध्ये अनेक स्टॉल लावण्यात आले होते या स्टॉलवर टेकचंद सावरकर , तहसीलदार अक्षय पोयाम यांनी भेट दिली तसेच […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com