नागपूर स्मार्ट सिटी तर्फे प्रकल्प बाधित नागरिकांना ईश्वर चिठ्ठीच्या माध्यमातून २८ सदनिकांचे आवंटन

नागपूर :- नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने अत्यल्प उत्पन्न गटातील २८ प्रकल्प बाधितांना नवीन नगर, पुनापूर पारडी येथे निर्माण करण्यात आलेल्या “होम स्वीट होम” च्या सदनिकांचे शुक्रवारी (ता.२७) ईश्वर चिठ्ठीच्या माध्यमातून आवंटन करण्यात आले. अत्यंत पारदर्शी पद्धतीने प्रकल्पबाधितांनी स्वतः त्यांच्या सदनिकेची ईश्वर चिट्टी काढली. आता या लाभार्थ्यांच्या कागदपत्रांची तपासणी करून, त्यांना सदनिकेची रजिस्ट्री करून दिली जाणार आहे. सदनिकेसाठी कुठलाही शुल्क नागपूर स्मार्ट सिटीतर्फे आकारण्यात आलेला नाही.

मनपाच्या छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील सातव्या माळ्यावर स्थित नागपूर स्मार्ट सिटीच्या सभा कक्षात नागपूर स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या प्रमुख उपस्थिती ही प्रक्रिया पार पडली. याप्रसंगी अधीक्षक अभियंता श्रीमती लीना उपाध्ये, महाव्यवस्थापक  राजेश दुफारे, मुख्य नियोजक राहुल पांडे, विधी अधिकारी  मंजीत नेवारे, आरएनआर अधिकारी ओमप्रकाश लांडे, पीएमसीचे राजेश मोहिते, अशोक पाटील यांच्यासह स्मार्ट सिटीचे अधिकारी, कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

नागपूर स्मार्ट सिटीतर्फे मौजा भरतवाडा, पुनापूर, पारडी आणि भांडेवाडी भागात १,७३० एकर मध्ये स्मार्ट सिटी विकसित केली जात आहे. या एबीडी क्षेत्रात प्रकल्पबाधित नागरिकांसाठी “होम स्वीट होम” प्रकल्प अंतर्गत एलआईजी आणि आर्थिक दृष्ट्या मागासवर्गातील नागरिकांसाठी EWS सदनिकांचे निर्माण करण्यात आले आहेत. यातील अत्यंत आधुनिक व सर्व सुविधा असलेल्या सदनिकांचे वाटप करण्यात आले. या इमारतीत खुले भूखंड, उद्यान, पाणी आणि सांड पाणी व्यवस्थापनाची सुविधा असणार आहे. या इमारतीच्या समोर 30 मीटरचा मोठा रस्ता आहे. अत्यल्प उत्पन्न गटातील सदनिकांचे पंजीयन करण्याकरिता केवळ मुद्रांक शुल्क आणि पंजीयनाचा खर्च सदनिकाधारकांना वहन करावा लागणार आहे. एक बेडरूम, हॉल, किचन असणाऱ्या सदनिकेचे क्षेत्रफळ 320 चौरस फूट इतके आहे.

यावेळी बोलताना नागपूर स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी सर्वप्रथम सदनिका प्राप्त झालेल्या अत्यल्प उत्पन्न गटातील प्रकल्प बाधित नागरिकांचे अभिनंदन केले. ते पुढे म्हणाले की, नवीन नगर, पुनापूर पारडी येथे निर्माण करण्यात आलेल्या “होम स्वीट होम” या सदनिकांचे बांधकाम पूर्ण झाले असून, दिवाळीपूर्वी सदनिका प्रकल्प बाधितांना देण्याचा मानस आहे. या प्रकल्प बाधितांची ‘विकल्प’ या स्वयंसेवी संस्थेद्वारे तपासणी देखील करण्यात आली असल्याचे पृथ्वीराज बी.पी यांनी सांगितले. याशिवाय सदर सदनिकांच्या लाभर्थ्यांनी मंगळवार ३१ ऑक्टोबर रोजी आवश्यक कागदपत्रे स्मार्ट सिटी कार्यालयात जमा करावी आणि पुढील प्रक्रियेसाठी तयार राहावे असेही त्यांनी सांगितले. सदर सदनिका त्यांच्या लाभर्थ्यांना पुढील ३० वर्षांच्या लीज तत्वावर दिल्या जाणार असून, लाभार्थ्यांनी मिळून एक हाउसिंग सोसायटी तयार करून सदनिकांच्या मेंटेनन्स व इतर बाबींवर देखरेख ठेवून कार्य करायचे आहे.

प्रारंभी आरएनआर अधिकारी ओमप्रकाश लांडे यांनी उपस्थित सर्व प्रकल्प ग्रस्तांना ईश्वर चिठ्ठीची प्रक्रिया समजून सांगितली. संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पडली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अन 22 हजार निराधार लाभार्थीच्या चेहऱ्यावर फुलले हास्य

Sat Oct 28 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – तीन महिन्याचे 4500 रुपये पेन्शन खात्यात जमा, दिवाळी गोड  कामठी :- दिवाळी अवघ्या 15 दिवसांवर येऊन ठेपली आहे त्यामुळे सर्वाना दिवाळी या सणाचे वेध लागले आहेत कामठी तालुक्यातील जवळपास 22 हजार निराधार लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या तीन महिन्यांचे थकीत असलेले चार हजार पाचशे रुपये एवढे मानधन शासनाने जमा केले आहेत.परिणामी यंदा दिवाळी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com