अन 22 हजार निराधार लाभार्थीच्या चेहऱ्यावर फुलले हास्य

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

– तीन महिन्याचे 4500 रुपये पेन्शन खात्यात जमा, दिवाळी गोड 

कामठी :- दिवाळी अवघ्या 15 दिवसांवर येऊन ठेपली आहे त्यामुळे सर्वाना दिवाळी या सणाचे वेध लागले आहेत कामठी तालुक्यातील जवळपास 22 हजार निराधार लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या तीन महिन्यांचे थकीत असलेले चार हजार पाचशे रुपये एवढे मानधन शासनाने जमा केले आहेत.परिणामी यंदा दिवाळी गोड होणार असल्याने प्रथमच वृद्ध निराधार,अपंग ,विधवा यांच्या चेहऱ्यावर हास्य पसरले आहे .

निराधार व्यक्तींना आर्थिक अडचण जाऊ नये या उद्देशाने केंद्र व राज्य शासनाकडून विविध अर्थसहाय्य योजना राबविण्यात येतात .कामठी तालुक्यात 22 हजार च्या जवळपास लाभार्थी निराधार योजनेचा लाभ घेत असून यासाठी महिण्याकाठी 2 कोटी 11 लक्ष 88 हजार रुपये अनुदान कामठी तालुक्याला मिळत आहे.मात्र मागील तीन महिन्याची थकीत लक्षात घेता प्रति लाभार्थी अनुदानात 500 रूपयाने वाढ होत 3 महिन्याचे एकत्र मानधन 4500 रुपये प्रमाणे अनुदान लाभला आहे.

यामध्ये इंदीरा गांधी निराधार योजना चे 8 हजार 254 लाभार्थी,श्रावणबाळ योजनेचे 11 हजार 60 लाभार्थी,इंदिरा गांधी वृद्धपकाळ योजनाचे 1843 लाभार्थी,तसेच इंदिरा गांधी विधवा योजना,इंदिरा गांधी अपंग योजना,संजय गांधी अनुसूचित जाती, अनूसुचित जमाती योजना आदीं योजनेच्या लाभार्थीचा समावेश आहे.तीन महिन्याचे थकीत मानधन जमा झाल्याने सण उत्सवात वृद्धांची आर्थिक चणचण दूर झाली आहे हे इथं व विशेष!

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

रामायणकार महर्षी वाल्मीकी यांना महावितरणचे अभिवादन

Sat Oct 28 , 2023
नागपूर :- प्रभू श्रीराम यांच्या जीवनातील सत्य, कर्तव्य, साहस यांचा परिचय करुन देणारे आणि आदर्श जीवन जगण्यास मार्गदर्शन करणा-या रामायण या महाकाव्याचे रचनाकार, आदिकवि महर्षी वाल्मीकी यांच्या जयंतीनिमित्त महावितरणतर्फ़े त्यांना अभिवादन करण्यात आले. महावितरणच्या विद्युत भवन या कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांच्या हस्ते महर्षी वाल्मीकी यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी अधीक्षक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com