अमरावतीचा आकाश राजपूत ठरला “महानगरपालिका श्री 2024″चा मानकरी 

– मनपाच्या “शरीर सौष्ठव स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

नागपूर :- नागपूर महानगरपालिका आणि बॉडी बिल्डर्स अँड फिटनेस असोसिएशन विदर्भ नागपूर यांचे संयुक्त विद्यमाने लकडगंज येथील अनाथ विद्यार्थी गृह क्रीडांगणावर आयोजित “नागपूर महानगरपालिका श्री २०२४ शरीर सौष्ठव स्पर्धा” अमरावतीचा आकाश राजपूत “महानगरपालिका श्री २०२४”चा मानकरी ठरला.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे हस्ते “नागपूर महानगरपालिका श्री २०२४ शरीर सौष्ठव स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी आमदार प्रवीण दटके, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, नागपूर महानगरपालिकेचे उपायुक्त सुरेश बगळे, क्रीडा अधिकारी डॉ. पियुष आंबुलकर, माजी नगरसेवक नरेन्द्र (बाल्या) बोरकर, तसेच असोसिएशनचे पदाधिकारी  अभिषेक कारींगवार, अविनाश लोखंडे, दिनेश चावरे, स्वप्निल वाघोले, सुधीर अभ्यंकर, डॉ. विवेक शाहू यांच्यासह मनपा क्रीडा विभागातील कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

स्पर्धेच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते “महानगरपालिका श्री २०२४” चा मान पटकाविणाऱ्या अमरावतीच्या आकाश राजपूत यांना ५१ हजार रुपये रोख व चषक प्रदान करण्यात आले. तर स्पर्धेत नागपूरकर योगेश शेंडे यांना “बेस्ट पोजर” म्हणून रु. ३१ हजार रोख व चषक देऊन गौरव करण्यात आला.

याशिवाय स्पर्धेच्या ६० किलो वजन गटात बुलढाणाच्या  दतात्रय सावरकर यांनी प्रथम पुरस्कार पटकाविला. द्वितीय पुरस्कार शिवाजी वाकोडे, तृतीय पुरस्कार, जमाल अंसारी, चतुर्थ पुरस्कार राजेश क्षीरसागर तर पाचवा पुरस्कार सुरज तीवाडे यांनी पटकाविला. ६५ किलो वजन गटात मोहम्मद शहजाद यांनी प्रथम, पंकज मडके यांनी द्वितीय पुरस्कार, शिवकुमार चव्हाण यांनी तृतीय पुरस्कार, दीपक धानोरकर यांनी चतुर्थ पुरस्कार तर श्रीकांत बोरसरे यांनी पाचवा पुरस्कार पटकाविला. ७० किलो वजन गटात शेख सलीम यांनी प्रथम, सैय्यद मोयुजुद्दीन यांनी द्वितीय पुरस्कार, शेख आरिफ यांनी तृतीय पुरस्कार, प्रीतम शाह यांनी चतुर्थ पुरस्कार तर श्रवण बावणे यांनी पाचवा पुरस्कार पटकाविला. ७५ किलो वजन गटात श्री.मोहम्मद आवेज यांनी प्रथम, सैय्यद वाजिद यांनी द्वितीय पुरस्कार, अब्दुल फारूख यांनी तृतीय पुरस्कार,  साहिल धनावत यांनी चतुर्थ पुरस्कार तर सुयश जडिये यांनी पाचवा पुरस्कार पटकाविला.

८० किलो वजन गटात योगेश शेंडे यांनी प्रथम, उमेश भाकरे यांनी द्वितीय पुरस्कार, राहुल सरोदे यांनी तृतीय पुरस्कार,  रवींद्र कुंभारे यांनी चतुर्थ पुरस्कार तर बॉबी शाहू यांनी पाचवा पुरस्कार पटकाविला. ८० किलो आणि त्यावरील गटामध्ये  आकाश राजपूत यांनी प्रथम, आशिष काळसर्पे यांनी द्वितीय पुरस्कार, मोहम्मद तनवीर यांनी तृतीय पुरस्कार, सर्वेश शाहू यांनी चतुर्थ पुरस्कार तर अक्षय प्रजापती यांनी पाचवा पुरस्कार पटकाविला. प्रत्येक वजन गटात अनुक्रमे प्रथम स्थानासाठी 20 हजार, दुस-या स्थानासाठी 15 हजार, तिस-या स्थानासाठी 10 हजार चौथ्या स्थानासाठी 7 हजार तसेच पाचव्या स्थानासाठी रु. 5 हजार पुरस्कार प्रदान करण्यात आले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

छावणी परिषद क्षेत्रात अक्षता कळस यात्रा

Tue Jan 9 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- अयोध्येहून निघालेली अक्षत कलश यात्रा छावणी परिषद परिसरात पोहोचली. या भागातील कल्पतरू कॉलनी येथील श्री गणेश मंदिरातून अक्षत कलश यात्रा काढण्यात आली. जी गुरुकृपा कॉलनी, गोकुळधाम, रामकृष्ण ग्रीन टाऊन, रामलक्ष्मी नगर आदी भागातून मार्गक्रमण करत परत कल्पतरू कॉलनीच्या मैदानावर ढोल-ताशा वाजवून यात्रेची सांगता करण्यात आली. त्यानंतर मंदिराच्या प्रांगणात प्रसादाचे वाटप करण्यात आले. या अक्षत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com