‘या’ कंपनीमुळे रखडली वातानुकूलित E-Bus खरेदी

– महापालिका काय कारवाई करणार ?

नागपूर (Nagpur) :- ऑगस्ट अखेरपर्यंत 24 वातानुकूलित इलेक्ट्रिक बस (AC E Bus) देण्यात असमर्थ ठरलेल्या पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी कंपनीला महापालिकेने नोटीस बजावली आहे. या कंपनीने आतापर्यंत केवळ दहा इलेक्ट्रिक बस महापालिकेला दिल्या. डिसेंबरपर्यंत 144 बस उपलब्ध करून देण्याचा करार आहे. परंतु ऑगस्टअखेर 24 ई बस देण्यात अपयशी ठरल्याने डिसेंबरअखेर 144 ई-बस मिळणार की नाही, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.

मागील वर्षी पंधराव्या वित्त आयोगाने इलेक्ट्रिक बस खरेदीसाठी 72 कोटींचा निधी दिला. त्यानंतर महापालिकेने पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी कंपनीला 144 वातानुकूलित ई-बससाठी आदेश दिला. 144 बस उपलब्ध करून देणे तसेच त्याची देखभालीसह कंपनीला वाठोडा येथे चार्जिंग डेपोही उभा करायचा आहे. चार्जिंग डेपोचे काम संथगतीने सुरू आहे.

त्यातच कंपनी ऑगस्ट अखेरपर्यंत 24 वातानुकूलित ईलेक्ट्रिक बस देण्यातही अपयशी ठरली. त्यामुळे महापालिकेने या कंपनीला नोटीस बजावली. कंपनीने सप्टेंबरमध्ये 24 बस उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली असल्याचे परिवहन विभागातील सूत्राने नमूद केले.

कंपनीला या वर्षाच्या डिसेंबरअखेर सर्व 144 बस महापालिकेला उपलब्ध करून द्यायच्या आहेत. पहिल्या टप्प्यात 24 बस देण्यात कंपनी अपयशी ठरल्याने डिसेंबरपर्यंत संपूर्ण 144 बस मिळण्याबाबत मनपातील अधिकारीही साशंक आहे. सध्या शहरात 388 बस धावत दररोज 80 हजार किमी धावत आहे. दररोज सव्वा लाख प्रवासी महापालिकेच्या आपली बसचा वापर करीत आहेत.

…तर कंपनीला दंड

कंपनीने आता 24 बसेस सप्टेंबरअखेर देण्याची ग्वाही दिली आहे. कंपनी डेडलाईन पाळण्यात अपयशी ठरल्यास महापालिका दंड आकारणार असल्याचे मनपातील सूत्राने नमूद केले. महापालिका व पीएमआय कंपनीत झालेल्या करारामध्ये विलंब झाल्यास दंडाचीही तरतूद आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

ठेकेदाराशी हातमिळवणी करत अधिकाऱ्यांनी लावला 18 कोटींना चुना

Thu Sep 7 , 2023
– गडकरी काय कारवाई करणार ? वर्धा (Wardha) :- तळेगाव (श्याम पंत) ते आर्वी या 12 किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्गाला गेल्या चार वर्षांपासून साडेसाती लागली आहे. आतापर्यंत दोन कंत्राटदार बदलण्यात आले असून, तिसऱ्याची नियुक्ती करण्यात आली; पण अद्यापही कामाचा थांगपत्ता नाही. आतापर्यंत झालेल्या कामामध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी कंत्राटदाराशी हात मिळवणी करत काम न करताही तब्बल 18 कोटींचे देयक अदा करून […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!