दिवेआगर येथे सुपारी संशोधन केंद्र उभारणार – कृषी मंत्री धनंजय मुंडे

मुंबई :- रायगड जिल्ह्याच्या श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगार येथे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत पाच एकर जागेत सुपारी संशोधन केंद्र उभारण्यास कृषी विभागाने मान्यता प्रदान केली आहे. यासाठी ५ कोटी ६४ लाख रुपये निधी खर्चास मान्यता देण्यात आली असल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी रायगड येथे या केंद्रासाठी पाठपुरावा केला होता.

रायगड जिल्ह्यात सुपारीचे बागायती पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेऊन सुपारी संशोधन केंद्र उभारले जावे यासाठी महिला व बालविकास मंत्री तटकरे, खासदार सुनील तटकरे, आमदार अनिकेत तटकरे आग्रही होते.

या सुपारी संशोधन केंद्राच्या माध्यमातून सुपारीच्या बुटक्या तसेच दर्जेदार व अधिकचे उत्पन्न देणाऱ्या जाती विकसित करणे, दिवेआगर व परिसरातील हवामानाचा विचार करून आंतरपिके घेण्याचे तंत्रज्ञान विकसित करणे, अत्याधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन, रोजगार निर्मिती, रोपवाटिका उभारणे, कलमे विकसित करणे, परिसरातील गावांचा ग्रामविकास आराखडा तयार करणे असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Mahadev Book Online : Directorate of Enforcement (ED) received credible inputs  

Wed Nov 8 , 2023
Raipur :- Directorate of Enforcement (ED) received credible inputs and conducted a successful search operations on 2/11/2023 in Chhattisgarh in which Rs 5.39 Crore cash has been intercepted in the poll bound state. ED is investigating Mahadev Book Online Betting APP syndicate in which the promoters of this betting syndicate are sitting abroad and remotely running thousands of panel across […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com