कृषि बाजार समितीतील हमाल, फळ विक्रेत्यांची आरोग्य तपासणी ८२ जणांनी घेतली कोरोनाची प्रतिबंधक लस

चंद्रपूर : चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या मार्फतीने दाताळा रोड रामनगर येथील कृषि उत्पन्न बाजार समितीमधील हमाल, फळ विक्रेते, भाजीपुरवठादार यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र -२ च्या वतीने आयोजित आरोग्य तपासणी शिबीरात २७५ हून अधिक व्यक्तींची तपासणी करण्यात आली. शिवाय ८२ जणांना कोरोनाची प्रतिबंधक लस देण्यात आली.

लसीकरण शिबीराचे उद्घाटन झोन-१ च्या सभापती छ्बुताई वैरागडे, कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती दिनेश चोखारे यांच्या हस्ते झाले. यावेळी सचिव श्री. पावडे आणि मुख्य वैद्यकीय अधिकारी वनिता गर्गेलवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी भारत, डॉ. अतुल चटकी, डॉ. अश्विनी येडे यांची उपस्थिती होती. यावेळी फिजिशियन व त्वचारोगतज्ञ डॉ. भागवत आणि स्त्रीरोगतज्ञ डॉ. साने तसेच दंतरोग चिकित्सक डॉ. राठी यांनी तपासणी केली. आरोग्य तपासणी व कोविड लसीकरण शिबिराला उपमहापौर राहुल पावडे यांनी देखील भेट दिली.
कृषि बाजार समितीतील हमाल, फळ विक्रेते आजच्या दगदगीच्या जीवनामध्ये आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. शिवाय जनतेच्या सतत थेट संपर्कात असतात. त्यामुळे आरोग्य सुदृढ राहावे असावे, यासाठी मनपाच्या पुढाकारातून आरोग्य तपासणी करण्यात आली. येथे पुढील काही दिवस कोविड लसीकरण होणार आहे. 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

मेट्रो स्टेशनवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा एकेरी उल्लेख तात्काळ बदलवा

Thu Nov 25 , 2021
नागपूर – सुगत वाचनालय संस्थेचे नारे-निदर्शने संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे संपूर्ण भारतातील एक पूज्यनिय व्यक्तिमत्त्व आहेत. संपूर्ण भारतात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदराच्या दृष्टिकोनातून पाहिल्या जाते. सर्व समाज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना नतमस्तक आहे. असे असतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, सी.ए. रोड येथे महामेट्रो द्वारा स्टेशनवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा नावाचा एकेरी उल्लेखाचा मोठा फलक लावण्यात आला. त्यामुळे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com