भंडारा दि.27: मृद व जलसंधारण तथा कृषी विभागाचे मुख्य सचिव एकनाथ डवले हे रविवारी विकास कामांची पाहणी करण्याकरिता भंडारा व गोंदिया जिल्हयाच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात सचिव डवले यांनी कृषी विभागांतील फळबाग व इतर योजनेच्या लाभार्थीशी चर्चा केली. व तेथील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. या भेटी दरम्यान त्यांचेसोबत अप्पर आयुक्त व मुख्य अभियंता देवराज व प्रादेशिक जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, नागपूर दुस्साने आदी उपस्थित होते .
त्यानंतर डवले यांनी साकोली तालुक्यातील बोदरा येथे भेट दिली व तेथील मामा तलावाची पाहणी केली. 20-21 ऑगष्ट 2020 ला अतिवृष्टीमुळे सदर तलावाची पाळ वाहून गेली होती. त्यात अनेक प्रकारचे नुकसान झाले होते. त्यानंतर जिल्हा परिषद लघु सिंचन विभागादारे मुख्यमंत्री जलसंवर्धन योजने मधून सदर कामाची निविदा काढूण तलावाच्या दुरुस्तीचे काम करण्यात आले.
या तलावाला तत्कालीन महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांचेसह तत्कालीन जिल्हा- धीकारी, जलसक्ती अभियान केंद्रीय समिती सह अनेक मान्यवरांनी तलावाला भेट देऊन पाहणी केली होती. सचिव महोदयाच्या भेटीत त्यांनी बोदरा येथील पाणी वापर संस्थेच्या पदाधिकांऱ्याशी चर्चा केली व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. सोबतच त्यांनी मत्स्य व्यवसाय करणाऱ्या संस्थेचे पदाधिकारी व उपस्थीत नागरीकांशी देखील संवाद साधला. तलावावर विदेशी पक्षी येतात सौंदर्यीकरण केल्यास तलावाचे संपूर्ण रूप पालटणार. सोबतच असलेल्या जागेवर ग्रीन जीम सुद्धा सूरू केल्यास गावातील नागरीकांना त्याचा फायदा होईल. पर्यटन वाढीस चालना मिळेल व स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल.बोदरा हे गांव राष्ट्रीय महामार्गापासून अगदी जवळ असल्यामूळे साकोलीतील नागरीक सुद्धा येथे मॉर्निंग वॉक करिता येत असतात. याचा फायदा गावातील नागरीकांना सुद्धा होइल आदी अनेक बाबींवर नागरीकांनी सचिव महोदयां- सोबत संवाद साधला.
मामा तलाव बोदरा येथील तलावाचे काम चांगल्या पद्घतिचे झाले आहे.तलावातील पानिसाठ्यामुळे जवळपास 99 हेक्टर शेतीला याचा लाभ होणार आहे.मत्स्य उत्पादन ही या तलावामध्ये घेतले जाते. तलावाचे दुरुस्तीचे काम हे चांगल्या पद्धतीचे झाले आहे. विभागाने अशीच उत्कृष्ट कामे करत रहावी व बळीराजाला त्याच्या जास्तीत जास्त फायदा होईल या दृष्टीने संपूर्ण राज्याने काम करण्याची गरज असल्याचे मत यावेळी सचिव महोदयांनी व्यक्त केले.
या भेटी दौऱ्या दरम्यान सुभाष कापगते, जिल्हा जलसंधारण अधिकारी, ल.पा.जि.प. भंडारा, अनंत जगताप, जिल्हा जलसंधारण अधिकारी, स्थानिक स्तर भंडारा-गोंदिया, सत्यजित राऊत जिल्हा जलसंधारण अधिकारी, ल.पा. जि.प. गोंदिया. संजय चाचीरे, महेश सेलूकर उपविभागीय जलसंधारण अधिकारी, दर्पण नागदेवे जलसंधारण अधिकारी, ल.पा.जि.प. भंडारा, जिल्हा कृषी अधिक्षक अर्चना कडू व पाणी वापर संस्था बोदरा चे अध्यक्ष भोजराम कापगते तसेच मत्स्य व्यवसाय करणारे संस्थेचे पदाधिकारी व गावातील नागरीक उपस्थित होते.