नागपूर :– कपाशी पिकावरील तंबाखुची पाने खाणाऱ्या अळीच्या (स्पोडोप्टेरा लिटुरा) प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी कृषी विभागाकडून या अळीच्या व्यवस्थापन व उपाययोजनेचा सल्ला विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाकडून देण्यात आला आहे.
वर्तमान स्थितीमध्ये कपाशी पिकावर स्पोडोप्टेरा लिटुरा अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. या किडीचा मादी पतंग कपाशी पानावर खालच्या बाजुने पुंजक्यात अंडी घालतो.एका अंडी पुंजक्यामध्ये 80 ते 100 अंडी असतात. या अंडयांमधून लहान लहान अळया समुहात बाहेर येतात व त्या पानातील हरितद्रव्य खाऊन पान जाळीदार करतात. या अळया मोठयाहाऊन पाने,शेंडे,फुले ,पात्या व बोंडे पोखरुण खातात. ही बहुभक्षीय किड अनेक पिकांवर आढळून येते.
या किडीच्या व्यवस्थापनासाठी बांधावरील तणाचा नायनाट करणे,शेतातील अळया टिपून खान्यासाठी पक्षांना बसण्यासाठी पक्षी थांबे लावणे,अळीग्रस्त पाने तोडून किडीसह नष्ट करणे,हेक्टरी १० कामगंध सापळे लावणे ,सापडयामध्ये आढळलेल्या पंतगाच्या नियंत्रणासाठी उपायोजना करण्याचा सल्ला विभागीय कृषी सहसंचालक उमेश घाटगे यांनी दिला आहे. या अळीची आर्थिक नुकसान संकेत पातळी दिसून येताच स्पिनोटोरम 11.70टक्के एससी 10 मिली किंवा सायंट्रानिलीप्रोल 10.26 ओडी 18 मिली किंवा क्लोरोपायरीफॉस 50टक्के आणि सायपरमेथ्रीन 5टक्के ईसी 20 मिली यापैकी कोणत्याही एका किटकनाशकाची प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.