– कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व कृषि विभागांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन.
कन्हान :- विभागीय कृषी सहसंचालक नागपुर विभाग नागपर यांच्या मार्गदर्शनात बोरडा (गणेशी) ता. पारशिवनी येथे शेतक-यांना शेती विषयक विविध प्रात्याक्षिक, माहिती व योजनेचे मार्गदर्शन करून शेती शाळेचा शेती दिन थाटात साजरा करण्यात आला.
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व कृषि विभागांच्या संयुक्त विद्यमाने पारशिवनी, मौदा, रामटेक, कामठी, भिवापूर, उमरेड, कुही या तालुक्यात शुन्य मशागात तंत्रज्ञान (SRT) या तंत्रज्ञानावर आधारित प्रत्येकी ५ शेतक-यांना भात पिकाचे प्रायोगिक तत्वावर प्रात्येशिके करून त्याच उद्दिष्टाने भात पिक प्रात्ये शिकाचे शेतक-यांना काय फलश्रुती झाली याकरिता (दि.०२) डीसेंबर २०२४ रोजी मौजा- बोरडा (गणेशी) ता. पारशिवनी येथे शेतकरी शेतिदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रा.प बोरडा सरपंच रेखाताई डडुरे, उपसरपंच नरेंद्र ठाकरे, प्रमुख अतिथी म्हणुन उमेश घाडगे विभागीय कृषी सह संचालक नागपुर विभाग, अर्चना कडु प्रकल्प संचालक आत्मा नागपुर, ग्रिष्मा देहाने उपविभागिय कृषी अधिकारी रामटेक, सूरज शेंडे प्रभारी तालुका कृषि अधिकारी पारशिवनी आदी मान्यव रांच्या मार्गदर्शनात शेतकरी शेतीदीन कार्यक्रम साजरा करण्यात आला.
प्रमुख मार्गदर्शक उमेश घाडगे यांनी शुन्य मशागत तंत्रज्ञान (SRT) शेतक-यांनी अवलंबन केल्यास जमिनीतील सेंद्रिय कर्ब व जमिनीची पोत सुधारण्यास मदत होऊन नागरणी, चिखलणी व रोपा ची लावनी न केल्याने मजुरावरील खर्चाच्या प्रमाणात ४० ते ५० टक्के बचत होते. तसेच त्यांनी प्रत्येक्षात सगुना राइस टेकनोलॉजी पद्धतीने लागवड केलेले शेतकरी मंगेश अमृते यांच्या बांधावर भेट देवुन त्यांना टेकनोलॉजीचा किती फायदा झाला व आधीची लागवड पद्धतीचा वापर करून लागवड पद्धतीत नफा व तोटा या मधिल तफावतीमध्ये सांखिकी स्वरुपात विचारणा केली.
त्यानंतर त्यांनी मौजा-कांद्री येथिल सुनिल मस्के यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रकीया उद्योग योजना अंतर्गत उभारणी करण्यात आलेली गहु फिल्टर, शेवळ्या व पापड उद्योग, मिरची कांडप यंत्र, मिनी डाळ मिल इत्यादी व्यवसायिकांना भेट देवुन त्यांना होणा-या उत्पादना विषयी माहिती घेतली. या प्रकारचे उद्योग इतर शेतक-यांनी योजनेच्या माध्यमातुन सुरु करून आपली आर्थिक उन्नती साध्य करावी. याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. शेतक-यांनी त्यांचे आभार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक अर्चना कडु यांनी सगुणा राइस टेकनोलाँजी (SRT) अवलंबन करण्यात आलेल्या शेतक-यासी विस्तृत स्वरूपात चर्चा करून गादीवाफ्याचे महत्त्व व गादीवाफा तयार केल्याने मुळाशी प्राणवायु खेळत असतो, जमिनीत ओलावा व वापसा टिकुन जमिनीतील सूक्ष्मजिवाणु व मित्र बुरशीच्या संख्येत वाढ होवुन जमि नीतील सेंद्रिय कर्ब वाढुन पिकाचा उत्पादनात वाढ होते. रब्बी क्षेत्र वाढवण्या चा दृष्टीने शेतक-यानी काय उपाययोजना व नियोजन केले पाहिजे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
ग्रिष्मा देहाने यांनी शेतकरी बांधवाना रब्बी हंगामातील पिकाचा पिक विमा काढण्याचे आवाहन केले. आणि सूरज शेंडे यांनी कृषि विभागांतील विविध योजना विषयी माहिती व मार्गदर्शन केले. सुत्रसंचान प्रमोद सोनकुवर सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक यानी तर आभार विवेकानंद शिंदे कृषि सहाय्यक निलज यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता प्रभाकर शिरपुरकर म.कृ.अ. कन्हान, सचिन कुबडे कृ.प. कन्हान, राजेश दोनोडे बी.टी.एम.रामटेक, दिनेश फुंडे बि.टी.एम.मौदा, प्रशांत शेंडे ए.टी.एम.पारशिवनी, नाशिक जांभुळकर ए.टी.एम.कामठी आदीने सहकार्य केले. याप्रसंगी प्रगतशिल शेतकरी स्वप्निल माटे, अशोक शिंगनापुरे, राहुल ननुरे, राजु डडुरे सह बहु संख्येने पारशिवनी, रामटेक, मौदा, कामठी तालुक्यातील महिला व पुरूष शेतकरी उपस्थित होते.