कृषी सहाय्यक संघटनेची जिल्हा कार्यकारिणी घोषित

संदीप कांबळे,कामठी
कामठी ता प्र 23:- आज महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटना जिल्हा शाखा नागपूर यांची नवीन कार्य करण्याची सभा कृषी महासंघ कार्यालय बीज परीक्षण प्रयोगशाळा नागपूर येथे संपन्न झाली. त्यामध्ये माजी जिल्हा कार्यकारणीतील पदाधिकार्‍यांचा निरोप समारंभ तसेच नवीन कार्यकारणी तील सर्व पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सर्व तालुक्यातील तालुका अध्यक्ष सचिव व जिल्हा प्रतिनिधी उपस्थित होते. सदर सभेत कृषी सहाय्यक संवर्गातील विविध अडचणी व समस्या वरती चर्चा विमर्श करण्यात आला. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनेचे माजी राज्य अध्यक्ष राहुल राऊत, नागपूर जिल्ह्याचे माजी अध्यक्ष प्रकाश टोंगसे, तसेच नवनिर्वाचित नागपूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष जगदीश भालेराव, कार्याध्यक्ष निरंजन गहूकर, सचिव राजेंद्र गुलाले, राज्य सहसरचिटणीस महेंद्र गजभिये, कोषाध्यक्ष बबन मालखेडे, प्रसिद्धीप्रमुख रवि राठोड, तसेच इतर महिला प्रतिनिधी उपस्थित होते. सदर सभेचे सूत्रसंचालन रवि राठोड व आभार प्रदर्शन राजेंद्र गूलाले यांनी केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

चंद्रपूर महानगरपालिकेच्या वतीने 25 एप्रिल ते दोन मेपर्यंत राष्ट्रीय जंतनाशक कार्यक्रम

Sun Apr 24 , 2022
चंद्रपूर – राष्ट्रीय जंतनाशक दिन हा कार्यक्रम मुले आणि पौंगंडाअवस्थेतील मुला-मुलींसाठी जंताच्या आजाराचा सामना करण्यासाठी फेब्रुवारी 2015 पासून सुरू करण्यात आला आहे.    राष्ट्रीय जंतनाशक दिन हा कार्यक्रम फेब्रुवारी आणि ऑगस्ट महिन्यात शाळा आणि अंगणवाड्यांमध्ये एका निश्चित दिवशी जंतनाशक गोळ्या देऊन दोनदा घेण्यात येतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शनानुसार  मातीतून प्रसारित होणाऱ्या कृमींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दोन जंतनाशक मोहीम येथील अंतर सहा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com