काटोल – विदर्भ महाकबड्डी स्पर्धेत खेळत असतांना मोर्शी येथे सामना दरम्यान अचानक तब्बेत खराब होऊन चक्कर येऊन पडली. त्यामुळे कु. प्रीती पुरुषोत्तमजी सातपुते हिला दि. 13 नोहेबर ला नागपूर येथे भरती करण्यात आले होते. ब्रेन ट्युमर असल्याचे समोर आल्याने सात दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत असतांना आज दि. 19 ला पहाटे तिने अखेरचा स्वाश घेतला. अतिशय भावुक वातावरणात तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मूळची पेठ बुधवार काटोल येथील रहिवासी असलेली कू. प्रीती हिचे शिक्षण प्राथमिक व हायस्कूल शिक्षण नगर परिषद शाळा काटोल येथे झाले. नबीरा कॉलेज नंतर भारसिंगी येथे शिक्षण घेत असताना कबड्डी स्पर्धेत तिने आपले नाव रोवून अनेक कबड्डी स्पर्धेत तिने यश संपादन केले. इयत्ता नववी मध्ये असताना कबड्डी स्पर्धेमध्ये शालेय स्टेट चंद्रपूर इथे तिची निवड झाली या शालेय कबड्डी स्पर्धेमध्ये नागपूर जिल्ह्यावर तसेच विभागस्तरावर ही कबड्डीची उत्कृष्ट खेळाडू म्हणून तिला गौरविण्यात आले होते. तिला अनेक पारितोषिके सुद्धा मिळाली आहेत. नुकताच विदर्भ महालिंग कबड्डी 2021 मध्ये तिची निवड झाली होती यामध्ये रीती राणा सुपर टीम खामगाव या संघांमध्ये तिची निवड झाली होती. ती मोर्शी येथे खेळत असताना तिची प्रकृती बिघडली. व मृत्यूशी झुंज देत काळाने आपला डाव साधून कु. प्रीती ने अखेरचा स्वाश घेतला. कू. प्रीती वर आज दि. 19 ला दुपारी काटोल येथे अंतिम संस्कार करण्यात आला. तिच्यावर अनेक खेळाडूं, काटोल वाशियानी श्रद्धांजली वाहली. कू. प्रीती ही घरात सगळ्यात मोठी होती. तिला लहान बहीण, भाऊ तसेच आई वडील आहे.