वकिलांच्या हितांसाठी डिस्टिक बार असोसिएशनचे अध्यक्ष रोशन बागडे यांचे समर्थन, ई -फाईलिंग प्रक्रिया बंद करण्याची मागणी

नागपूर :- ई -फाइलिंग प्रक्रिया विरुद्ध संघर्ष समिती जिल्हा सत्र न्यायालय नागपूर यांच्या अंतर्गत किरण महेंद्र यांच्या नेतृत्वात शुक्रवारी 12 जानेवारी सत्र न्यायालया समोर धरणे आंदोलन करण्यात आली.

नागपूर जिल्हा सत्र न्यायालय येथील ई-फायलिंग प्रक्रिया थांबविण्याकरिता दगदी बार रुम च्यावतीने सर्व वकिल एकत्रीत येवून नारे-निदर्शने करण्यात आले. वकिलांच्या हितासाठी मार्ग काढावा यासाठी त्यांच्या मागण्या करिता आंदोलन करण्यात आले. त्यांची सर्वात मोठी मागणी म्हणजे ई-फाईलिंग प्रक्रिया बंद करा अशी मागणी करत रोष निर्माण केला. यावेळी डिस्टिक बार असोसिएशनचे रोशन बागडे यांनीही समर्थन दिले. तसेच वरिष्ठ वकील एड.कमल सतुजा, प्रकंज जयस्वाल, नितीन देशमुख यांनी पाठिंबा देऊन सहकार्य केले.

अँड. फातिमा पठाण, अँड. सुनील गायकवाड, अँड. रवि प्रकाश वर्मा, अँड.उदय चिंचोलकर, अँड. सूर्यकांत जयस्वाल, अड.आशिष नायक, अँड.नितीन धुळे, अँड.विलास वंजारी, अँड. विक्रम गोरे, आणि अँड परमार, धरना आंदोलनात सहभागी झाले होते. याप्रसंगी संचालन अँड. फातिमा पठाण यांनी केले. ई -फाईलींग प्रक्रिया बंद करून वकिलांच्या हितासाठी मार्ग काढावा याकरिता धरणे आंदोलन करण्यात आली त्याला DBA चे अध्यक्ष रोशन बागडे यांनी समर्थन दिले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

शासकीय मालमत्तेची अवैद्यारीत्या विक्री करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

Sat Jan 13 , 2024
नागपूर :- शासकीय मालमत्तेची अवैद्यारीत्या विक्री करीत इतरांची फसवणूक करणाऱ्यांवर १० जणांवर नागपूर महानगरपालिकेच्या स्थावर विभागाकडून वाठोडा पोलिस ठाण्यात तक्रार करीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाठोडा पोलिस ठाणे हद्दीतील मौजा- तरोडी (खुर्द) येथे खसरा क्र. ५५ (जुना क्र. 2/1, 5/1, 6/4 व 4) आराजी – 11.07 ही आर जमीन ज्याची किंमत रु. १४० कोटी इतकी आहे. ही जमीन नागपूर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com