रामटेक चित्रनगरीसाठी जागा हस्तांतरणाबाबत प्रशासकीय त्वरित – आशिष शेलार

नागपूर :- रामटेक येथील नियोजित चित्रनगरीसाठी महसूल विभागाने सांसकृतिक विभागास तत्काळ जागा हस्तांतरीत करण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने या चित्रनगरीचे निर्माण होत असून या प्रकल्पासाठी सांस्कृतिक विभागाने तत्वत: मान्यता दिली असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृहात चित्रनगरीबाबत आढावा घेतांना ते बोलत होते. सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री आशिष जयस्वाल, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यावेळी उपस्थित होते. रामोजी फिल्म सिटीचे संचालक राजीव जालनापूरकर यांनी दूरदृष्यप्रणालीद्वारे सहभाग घेतला.

रामटेक येथील खिंडसी तलावाजवळ चित्रनगरी तयार करण्यात येणार आहे. चित्रीकरण व इतर बाबींसाठी ही जागा योग्य असून हे ठिकाण वनक्षेत्राशी जोडले असल्याने पर्यटनास भरपूर वाव आहे. यातून रोजगार निर्मिती होईल. चित्रनगरीसाठी प्रशिक्षीत मनुष्यबळ तयार करण्यासाठी येथे प्रशिक्षण केंद्र तयार करण्यात येईल असे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले.

चित्रीकरणासाठी लोकांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. चित्रनगरीसाठी याक्षेत्रातील लोकांनी कार्यशाळा घ्याव्यात, असे ते म्हणाले.

या प्रकल्पामुळे मध्यप्रदेश छत्तिसगड येथील निर्मात्यांना डाक्युमेंटरी, लघुपट तयार करण्यासाठी मोठी सुविधा उपलब्ध होणार असल्याचे सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सांगितले.

ही चित्रनगरी नागपूर विमानतळ येथून अवघ्या 40 किलोमिटरवर आहे. याभागात रिसार्ट भरपूर आहेत. यासर्व बाबींचा लाभ निर्मात्यांना होईल, असेही त्यांनी सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

शिवजयंतीच्या मुहूर्तावर जय शिवाजी जय भारत पदयात्रा

Sat Feb 15 , 2025
– पंतप्रधान नरेंद्र मोदी देशास संबोधित करणार – विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन नागपूर :- 19 फेब्रुवारीला शिवजयंती साजरी करण्यात येणार असून त्यानिमित्ताने शहरात ‘जय शिवाजी जय भारत’ पदयात्रेचे आयोजन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. या कार्यक्रमास शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. या औचित्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरदृष्यप्रणालीद्वारे देशास […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!