बरीएम तर्फे प्रशासकीय अधिकाऱ्यांचा सत्कार

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या 67 व्या धम्मक्रांती दिनानिमित्त यावर्षी दीक्षाभूमी नागपूर च्या हाकेच्या अंतरावर असलेल्या कामठी शहरातील विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे गौतम बुद्ध व आंबेडकर भवन परिसर येथे परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याला नतमस्तक होण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातील लाखोंच्या संख्येत अनुयायी दोन दिवसांपूर्वी पासूनच जमले होते या अनुयायांची सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी व कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात ठेवण्यासह वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासह अनुयायांच्या इतर सोयी सुविधांसाठी कामठी येथील नगर परिषद प्रशासनासह विशेषत्वाने नवीन कामठी पोलीस स्टेशन विभाग व जुनी कामठी पोलीस स्टेशन विभागाने मोलाची कर्तव्यदक्ष भूमिका बजावली त्या निमित्याने बहुजन रिपब्लिकन एकता मंच तर्फे नविन कामठी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे , जुनी कामठी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक दीपक भिताडे तसेच नगर परिषदचे जमादार अजय नाहर यांचे शॉल, पुष्पगुच्छ व मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आले.

या वेळी अजय कदम, दिपक सिरीया, दिपंकर गणविर, उदास बंसोड, सुभाष सोमकुवर, अशपाक कुरेेशी, अनुभव पाटील, मनीष डोंगरे, अनिल चौरसिया ईत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नागपुर महानगर पालिका आयुक्तांना कधी कळणार कंत्राटी कामगाराच्या वेदना

Fri Nov 3 , 2023
– सुरक्षा रक्षकांना वेतनापोटी प्रत्येकी १९,७५६; पण हातात मिळतात ११ हजार नागपूर :- भांडेवाडीची सुरक्षा करीत असलेल्या ३० सुरक्षारक्षकांना १२ तासांच्या नोकरीचे वेतन मनपाने १९,७५६ रुपये त्यांना दिले आहेत; पण कंत्राटदार कंपनीकडून केवळ ११ हजार रुपये त्यांच्या वाट्याला येत आहेत. मनपाच्या कार्पोरेट बिल्डिंगमध्ये कर्तव्य बजावणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना यांच्या वेदना का दिसत नाही, असा सवाल या सुरक्षा रक्षकांचा आहे. महापालिकेने […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com