शहरात २२ अग्निशमन केंद्रांच्या मास्टर प्लॅनला प्रशासकीय मान्यता

– शहर सुरक्षेसाठी अग्निशमन विभागाचे बळकटीकरण

नागपूर :- नागपूर शहराचा भौगोलिकरित्या विकास झाल्याने लोकसंख्येत वाढ झाली आहे. याच बरोबर शहरात गगनचुंबी इमारती, शॉपींग मॉल, स्मॉल स्केल इंडस्ट्रीज, हॉस्पीटल, गर्दीचे बाजारपेठ, शैक्षणिक संस्था, शासकीय इमारती, स्लम वस्ती, इत्यादी अस्तिवात आल्याने दुर्घटनांचे प्रमाण देखील वाढले आहेत. अशा परिस्थितीत समर्थपने कार्य करून नागरिकांना तत्पर अग्निशमन सेवा उपलब्ध करून देण्याकरिता अग्निशमन व आपात्कालीन सेवा विभागाचे बळकटीकरण आवश्यक आहे. त्यादृष्टीने नागपूर महानगरपालिकेने महत्वाचे पाउल उचलेले आहे. नागपूर शहरात २२ अग्निशमन केंद्र प्रस्तावित असून या केंद्रांच्या मास्टर प्लॅनला प्रशासकीय मान्यता प्राप्त झालेली आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या विशेष पुढाकारामुळे नागपूर शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचे कार्य सुरू आहे, अशी माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी बी.पी.चंदनखेडे यांनी दिली.

सद्यस्थितीत अग्निशमन व आपात्कालिन सेवा विभागाच्या आस्थापनेवर १३ अग्निशमन केंद्र असून सध्या ९ अग्निशमन केंद्र कार्यरत आहेत. ३ अग्निशमन केंद्राचे बांधकाम सुरू आहे व शहरातील विस्तारीत लोकवस्तीचे क्षेत्रफळ व लोकसंख्येनुसार नव्याने १० अग्निशमन केंद्राकरिता आरक्षित जागा उपलब्ध करण्यास प्रस्तावित केले आहे.

अग्निशमन व आपात्कालीन विभागाचे आस्थापनेवर १३ अग्निशमन केंद्र असून याकरिता ८७२ पदांचे आकृतीबंध मंजूर आहे. सध्या ९ अग्निशमन केंद्र कार्यरत असून ६११ पदे अनुज्ञेय ठरतात. सध्या वेगवेगळ्या संवर्गाचे १५२ पदे कार्यरत असून ४५९ पदे रिक्त असल्याने अग्निशमन व विमोचनाचे कार्य करण्यास विभागाला अडथळा निर्माण होतो. त्यामुळे ३५० वेगवेगळ्या पदाची सरळसेवेची भरती प्रक्रिया प्रस्तावित केली असून उपलब्ध मनुष्यबळामधून पदोन्नती देणे प्रस्तावित आहे.

याशिवाय आपात्कालीन परिस्थितीमध्ये विभागाकडे झाडे पडणे, घरात पाणी शिरणे, शिकस्त घर पडणे, इत्यादी दुर्घटन्यांची वर्दी/सुचना जास्त प्रमाणात प्राप्त होत असते. अशा प्रसंगी कार्य करण्यास वेगवेगळ्या प्रकारचे शोध व बचाव साहित्य आवश्यक आहे. याकरिता विभागाद्वारे १४ चॅन सॉ, ५ इनफ्लॅटेबल पॉवर रबर बोट खरेदी करण्यात आले आहेत. यासोबतच नागपूर शहरातील अंबाझरी, फुटाळा व गोरेवाडा या तलावावर पोहण्यास व सेल्फी काढण्यास मज्जाव केलेला असुन धोकादायक परीस्थीती उदभवल्यास नागरिकांच्या जीव सुरक्षिततेच्या दृष्टीकोणातून त्यासंबंधीचे सुचनाफलक व बॅरीकेटस विभागामार्फत लावण्यात आलेले आहेत. अग्निशमन व आपात्कालीन सेवा विभागाच्या एकूण २९ वाहनांवर (Fire Tender) जीपीएस सिस्टीम लावण्यात आलेले आहे, अशीही माहिती बी.पी. चंदनखेडे यांनी दिली.

शासन निर्णयानुसार संपूर्ण राज्यात मोटरवाहन निष्कासन प्रणाली राबविण्यात येत असल्याने अग्निशमन विभागात कार्यरत असलेले १५ वर्षा पेक्षा जास्त कालावधी झालेले ९ अग्निशमन वाहन निष्कासित करण्यात आलेली आहेत. त्यामुळे अग्निशमन वाहनांची संख्या विभागात अपुरी होत असल्याने तसेच वाठोडा, पुनापूर, व पाचपावली अग्निशमन केंद्राचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे. या अग्निशमन केंद्राचे बांधकाम पूर्ण होउुन या आर्थिक वर्षात अग्निशमन विभागात कार्यान्वित होणार आहेत. या केंद्राकरिता नवीन अग्निशमन वाहने खरेदी करणे आवश्यक असल्याने १४ वेगवेगळया क्षमतेचे वाटर फायर टेंडर खरेदीची निविदा प्रक्रिया सुरू आहे. तसेच उंच इमारतीत अग्निशमन व बचाव कार्य करण्याकरिता ७० मीटर उंचीचे हॉयड़ोलिक प्लेटफार्म खरेदीचे कार्यादेश निगर्मित करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.

अग्निशमन विभागाचे पुढील नियोजन

नागपूर शहरातील नागरिकांना आपात्कालीन स्थितीत वेळीच मदत पोहोचावी यादृष्टीने अग्निशमन व आपात्कालीन सेवा विभागाद्वारे नियोजन करण्यात आले आहेत. त्यानुसार एकूण ६ अग्निशमन केंद्रांकरिता बोट वाहून घेण्याकरिता ७ नवीन Troop Carrier वाहन १० इमरजन्सी टेंडर खरेदी प्रास्तावित करण्यात येणार आहे. वाठोडा, पुनापूर, व पाचपावली अग्निशमन केंद्राचे निर्माण कार्य पूर्ण झालेले असून लोकार्पण करणे प्रस्तावित आहे. कळमना प्रादेशिक अग्निशमन प्रशिक्षण केद्रांमधील अतिरिक्त जागेवर जलतरण तलावाचे बांधकाम कामाचे कार्यादेश निर्गमीत करण्यात आलेले आहेत, असेही मुख्य अग्निशमन अधिकारी बी.पी.चंदनखेडे यांनी सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

हृदयरोग, कॅन्सर, पचन क्रिया, मधुमेह इ. सर्व दुर्धर आजारांवर 325 रूग्नांची तज्ञांकडून तपासणी व उपचार

Sat Aug 24 , 2024
देसाईगंज :- संत निरंकारी मंडळ, शाखा वडसा (देसाईगंज) च्या वतीने आज संत निरंकारी सत्संग भवन, आरमोरी रोड, देसाईगंज येथे रोग निदान शिबीराचे आयोजन करण्यांत आले. यात डॉ. पुरुषोत्तम आरोय, M.D हृदयरोग तख, हुबली, कर्नाटक, डॉ. मनीष मोतीलाल जेठगनी, M.S. सर्जिकल ऑन्कोलाजी (कॅन्सर) मुंबई, डॉ. कंचन सच्चानन्दानी, M.S सर्जिकल गैस्ट्रोएंटरोलॉजी, मुंबई, डॉ. अंकिता केणी, मुंबई, डॉ. प्रिया मोतीलाल नेठानी, पुणे, डॉ. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!