आदित्य ठाकरेंचा ड्रीम प्रोजेक्ट मनसेमुळे रद्द

– मनसेचे निवेदन 

मुम्बई :- ३० जानेवारी २०२२ रोजी मनसेने एका निवेदनाद्वारे बेस्ट उपक्रमाचे तत्कालीन जनरल मॅनेजर लोकेश चंद्रा यांच्याकडे डबल डेकर इलेक्ट्रिक बसेसच्या पुरवठ्यातील अनियमितता समोर आणल्या होत्या.

यानुसार कॉसिस ई मोबिलिटी लिमिटेड आणि स्विच मोबिलिटी ऑटोमोटिव्ह लिमिटेड या आस्थापनांना निविदा प्रक्रिया न राबवता तसेच बेस्ट कमिटी अस्तित्वात नसताना अतिरिक्त बसगाड्या पुरविण्याचे काम देण्यात आले होते.

बेकायदेशीररित्या निधी वाळविल्याचा मनसेचा आरोप : 

याबाबत मनसेच्या बेस्ट कर्मचारी सेनेच्या कार्याध्यक्ष केतन नाईक यांनी तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या खात्याअंतर्गत असलेल्या महाराष्ट्र शुद्ध हवा अभियानाअंतर्गत येणारा निधी बेकायदेशीररित्या वळता करत संबंधित कंपन्यांना अतिरिक्त बसगाड्या पुरवठा करण्याचे काम देण्यात येत असल्याचा आरोप केला होता.

कॉसिस कंपनीचे पाकिस्तान कनेक्शन : 

यानंतर आशिष शेलार यांनी विधानसभेत कॉसिस ई मोबिलिटी लिमिटेड या कंपनीत पाकिस्तानातील लोकांची गुंतवणूक असल्याचा दावा विधानसभेत केला होता.

स्पर्धात्मक दर : 

कुठल्याही वस्तूंचा पुरवठा करताना quantity वाढल्यास पुरवठा दर कमी व्हावा असे संकेत असताना देखील कॉसिस ई मोबिलिटी या कंपनीला त्याच दरात अतिरिक्त बसगाड्या पुरवठा करण्याचे काम देण्यात आले होते व टाटा सारख्या भारतीय कंपन्यांना स्पर्धेतून बाहेर ठेवण्यात आले होते म्हणून सदरचे कंत्राट रद्द करून पुन्हा नव्याने निविदा प्रक्रिया राबवून भारतातील आस्थापानांना निविदा प्रक्रियेत सामावून घेत स्पर्धात्मक दराने काम द्यावे व बेस्ट उपक्रमाचे पैसे वाचवावे अशी मागणी मनसेने केली होती.

नव्याने निविदा प्रक्रिया : 

आज बेस्ट उपक्रमाने पूर्वीच्या निविदा प्रक्रियेतून नियुक्त करण्यात आलेल्या कॉसिस ई मोबिलिटी लिमिटेड या कंपनीचे काम रद्द करत डबल डेकर इलेक्ट्रिक बसेसचा पुरवठा करण्यासाठी नवीन निविदा जाहीर केली आहे.

मुंबईकरांना सेवा कधी मिळणार : 

या सर्व गोंधळात मुंबईकरांना बससेवा मिळण्यात अकारण उशीर होत असल्याचे मनसेच्या वतीने आधीच म्हटले होते.आतातरी लवकरात लवकर मुंबईकरांना वातानुकूलित इलेक्ट्रिक बससेवेचा आनंद घेता येईल हि अपेक्षा.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे पुन्हा मृतप्राय होत आहे

Tue Mar 14 , 2023
चंद्रपुर :- चंद्रपूरची जीवनदायनी इरई नदी प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे पुन्हा मृतप्राय होत आहे. इरई नदी दाताळा पुलाजवळील ठक्कर कॉलोनी मागे दोन भागात विभाजीत होते मुख्य पात्र देवाळा बाजूचा तर दुसरे पात्र शांतीधाम मागून वाहत चोराळा पुलाजवळ संगम होत पुढे हडस्ती गावा जवळ वर्धा नदीला मिळते.मुख्य पात्र गाळ साचल्यामुळे प्रवाह हीन होत पूर्ण बुजला आहे. त्यामुळे एक थेंब पाणी या पात्रातून […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com