‘किटकजन्य आजारांपासून सतर्कतेसाठी यंत्रणा सज्ज ठेवा’ – – अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी घेतली बैठक

नागपूर :- पावसाळ्यात उद्भवणा-या डेंग्यू, मलेरिया व चिकनगुनिया यासारख्या किटकजन्य आजारांपासून सतर्कतेसाठी मनपाची संपूर्ण यंत्रणा सज्ज ठेवावी असे निर्देश अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी दिले.

मनपा अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी(ता.२८) ‘राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम 2024’ अंतर्गत ‘किटकजन्य आजार व डेंग्यू’ संदर्भात बैठक घेण्यात आली.

बैठकीत उपायुक्त प्रकाश वराडे, उपायुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख डॉ. गजेंद्र महल्ले, अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, मलेरिया फायलेरिया अधिकारी डॉ. मंजुषा मठपती यांच्यासह विविध विभागांचे प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी मनपा अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी सर्व विभागांना समन्वयाने कार्य करण्याच्या सूचना दिल्या, तसेच डेंग्यू, हत्तीरोग, मलेरिया, चिकनगुनिया, स्क्रब टायफस यासारख्या किटकजन्य आजारांपासून सतर्कतेसाठी उपाय योजना तयार ठेवण्याचे निर्देश दिले. याशिवाय पावसाळा सुरू होण्यापूर्वी पाणीसाचण्याची जागा, बाजारपेठ परिसर आदी ठिकाणांचे सर्वेक्षण करून येथे गप्पीमासे सोडावेत, स्थानिक नागरिकांना ‘किटकजन्य आजार व डेंग्यू’ यासंदर्भात जनजागृत करण्यात यावे, डेंग्यू नियंत्रण कक्ष आणि संपर्क क्रमांकाची तपासणी करून घ्यावी. पुरेशा स्वरुपात धूरफवारणी मशीन असले असे नियोजन करावे असे निर्देशही अतिरिक्त आयुक्त  आंचल गोयल यांनी दिले आहे. बैठकीत सर्वप्रथम मलेरिया फायलेरिया अधिकारी डॉ. मंजुषा मठपती यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे ‘किटकजन्य आजार व डेंग्यू’ संदर्भात माहिती दिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Birth Anniversary of Swatantryaveer Savarkar Governor Bais offers tributes to Veer Savarkar

Tue May 28 , 2024
Mumbai :- Maharashtra Governor Ramesh Bais offered floral tributes to the portrait of Veer Vinayak Damodar Savarkar on the occasion of the birth anniversary of Veer Savarkar at Raj Bhavan, Mumbai on Tue (28 May). Officers and staff of Raj Bhavan also offered their respects to Veer Savarkar on the occasion. Follow us on Social Media x facebook instagram

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com