अनधिकृत बॅनर होर्डींगवर होणार कारवाई  

चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिका हद्दीत परवानगी न घेता अनधिकृत बॅनर होर्डींग, स्टिकर्स लावणाऱ्यांविरुद्ध सक्त कारवाई केली जाणार असुन संबंधितांनी याची नोंद घेऊन रीतसर परवानगी घेऊनच बॅनर अथवा होर्डींग लावण्याचे आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे.

महानगरपालिका हद्दीत डिजिटल पोस्टर्स, जाहिरातीची होर्डिंग, बॅनर उभारतांना मनपाकडून रीतसर परवानगी घेऊन यासंबंधी आकारण्यात येणारा टॅक्स भरणे आवश्यक असते. मात्र अनेकदा टॅक्स न भरता व परवानगीही न घेता बॅनर इत्यादी लावण्यात येतात.

अश्या अनधिकृत बॅनर, होर्डिंग्सची मुळे शहराचे विद्रुपीकरण तर होतेच शिवाय मनपाचे आर्थिक नुकसानही होते.अश्या व्यक्तीवर आता कारवाई केली जाणार असुन प्रसंगी शहर विद्रुपीकरण कायद्यांतर्गत गुन्हासुद्धा दाखल केल्या जाणार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

44 वर्षांपूर्वीचा लॉन्गमार्च : उत्तम शेवडे

Mon Nov 13 , 2023
मराठवाडा विद्यापीठाला डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याचा ठराव 27 जुलै 1978 रोजी महाराष्ट्र शासनाच्या विधानसभा व विधान परिषद या दोन्ही सभागृहात एकमताने पास करण्यात आला. त्या ठरावाची (घोषणेची) अंमलबजावणी करावी यासाठी आजपासून 44 वर्षांपूर्वी नागपूरच्या दीक्षाभूमीवरून प्रा जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वात 11 नोव्हेंबर 1979 रोजी नागपूर ते औरंगाबाद असा लॉन्गमार्च काढण्यात आला होता. या लॉंगमार्च मध्ये नागपूर व परिसरातील हजारो […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!