एकल खिडकी प्रणालीस प्रतिसाद

– १५२ मंडळांनी केले अर्ज

– ५९ मंडळांना मिळाली परवानगी 

चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे गणेशोत्सवाप्रसंगी सार्वजनीक गणेश मंडळांना लागणाऱ्या विविध परवानगीसाठी सुरु करण्यात आलेल्या एकल खिडकी प्रणालीस (single window system ) चांगला प्रतिसाद मिळत असुन आतापर्यंत १५२ सार्वजनीक गणेश मंडळांनी परवानगीसाठी अर्ज सादर केले असुन ५९ मंडळांना सर्व विभागामार्फत परवानगी देण्यात आली आहे.

येत्या १९ सप्टेंबरपासून शहरात दहा दिवस गणेशोत्सव साजरा होणार आहे. याकरीता गणेश मंडळांना महापालिका व इतर विभागाकडून रीतसर परवानग्या घ्याव्या लागतात. पोलीस स्टेशन, ट्राफिक पोलीस,सार्वजनिक बांधकाम, अग्निशमन, महावितरण केंद्र, महानगरपालिका इत्यादी विभागाच्या परवानगी या एकच ठिकाणाहुन घेता याव्या यासाठी एक खिडकी प्रणाली चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे सुरु करण्यात आली आहे.

गणेश मंडळांना अर्ज करणे सोपे जावे याकरीता महानगरपालिका कार्यालयात एकल खिडकी प्रणाली मदतकक्ष सुद्धा स्थापन करण्यात आला आहे. सुटीच्या दिवशीही सदर मदतकक्ष सुरु ठेवण्यात येत असल्याने सर्व गणेश मंडळांना त्याचा लाभ मिळत आहे. https://pandal. cmcchandrapur.com या लिंकद्वारे ऑनलाईन अर्ज सादर करता येऊ शकतो. मनपा हद्दीतील १५२ सार्वजनीक गणेश मंडळांनी आतापर्यंत परवानगीसाठी अर्ज सादर केले असुन अजुन संख्या वाढण्याची शक्यता आहे. गणेशोत्सव प्रदुषणमुक्त होण्याच्या दृष्टीने पीओपी मुर्तींना थारा न देता शाडूच्या मुर्तींचाच वापर करण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

NewsToday24x7

Next Post

राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारांवर आधारित कार्यक्रमाचे दूरदर्शनवरून प्रसारण

Fri Sep 15 , 2023
मुंबई :- क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारांचे वितरण नुकतेच मुंबईत झाले. या सोहळ्यावर आधारित विशेष कार्यक्रमाचे प्रसारण मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून रविवार दि. 17 सप्टेंबर रोजी रात्री 7.30 ते 8.30 या वेळेत करण्यात येणार आहे. समाजाची निःस्वार्थ भावनेने आणि निष्ठेने सेवा करणाऱ्या व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या अंगीकृत कामात प्रोत्साहन देण्याच्या आणि त्यांच्या गुणांचा यथोचित […]

You May Like

Latest News

The Latest News

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com