घाटरोहणा येथे अवैद्य रेती चोरी वाहतुक करणारा ट्रँक्टर ट्रॉली पकडुन दोन आरोपीवर कारवाई 

महसुल विभागाने ट्रॅक्टर ट्रॉली पोलीसाच्या स्वाधिन करून दंडात्मक कारवाई करणार.

कन्हान : – पारशिवनी तालुका महसुल विभागाच्या पथकाने कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत जुनी कामठी, घाटरोहणा रस्त्यावर कारवाई करित कन्हान नदीची अवैद्य रेती चोरी करून नेणा-या ट्रँक्टर ट्रॉली रेतीसह पकडुन जप्त करण्यात आली असुन दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याची माहिती महसुल विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

पारशिवनी तालुकातील कन्हान पोलीस स्टेशन हद्दीतील जुनीकामठी घाटरोहणा रस्त्याने कन्हान नदीतुन रेती चोरी करून अवैद्य वाहतुक केली जात असल्याची माहिती मिळताच महसुल विभागाच्या पथकातील तलाठी भोसले यांनी या मार्गाची पाहणी केली असता गुरुवार (दि.१२) सकाळी ११ वाजता दरम्यान ट्रँक्टर क्र. एमएच ४०/बीजे – ९४१५ क्रमांकाचा ट्रॅक्टर येताना दिसला. तेव्हा ट्रॅक्टर अडवुन झडती घेतली.त्या ट्रॅक्टरच्या ट्रॉली क्र. एमएच ४०/ए- ५२१३ मध्ये रेती आढळुन येताच कर्मचाऱ्यांनी कागदपत्रांची तपासणी केली. तर रेतीची विना रॉयल्टी वाहतुक असल्याचे स्पष्ट होताच रेती सह ट्रॅक्टर ताब्यात घेऊन कन्हान पोलीसांच्या स्वाधिन करण्यात आले. याप्रकरणी ट्रॅक्टर चालक अप्पी भोयर आणि मालक सुधांशु मेश्राम या दोघांच्या विरोधात महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम १९६६ चे कलम ४८ (७) व (८) अन्वये कारवाई कर ण्यात येणार असल्याची माहिती तलाठी एस. व्ही. भोसले यांनी दिली. अवैद्य रेती चोरीस आळा घालण्यासाठी रेती सह ट्रॅक्टर ट्रॉली कन्हान पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Vice President arrives in Mumbai on a day's visit

Sun Jan 15 , 2023
 Mumbai :-Vice President of India Jagdeep Dhankhar arrived in Mumbai on Sat (14 Jan.) on his maiden visit to the State since taking charge of his post. Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari welcomed the vice president and Dr. Sudesh Dhankhar at the CSMI Airport. Minister of Tourism and Skills Mangal Prabhat Lodha, ACS Nand Kumar and senior officials were present. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com