कन्हान :-दिनांक २८.११.२०२३ रोजी फिर्यादी व कन्हान स्टॉफ यांना गोपनीय सुत्रा कडून माहिती मिळाली की, जबलपूर कडून नागपूर मार्गे आयसर ट्रक कमांक एम एच ४० सी एम ८३५१ वाहनात अवैध्यरित्या गोवंश जतीचे जनावरे (म्हशी) हे क्लेशदायक व क्रूरपणे भरून कत्तली करीता घेवून जात आहे, अश्या मिळालेल्या माहिती वरून यातील पोलीस स्टॉफ यांनी जवलपूर ते नागपूर नॅशनल हायवे ४४ रोड वरील मौजा कोद्री रोड वरील टोल नाका या ठिकाणी सदर वाहन पकडले असता, एक आयसर ट्रक क्रमांक एम एच ४० सी एम ८३५१ मध्ये एकुण २४ गोवंश जातीचे जनावरे मिळून आले सदर ट्रक चालक क्लीनर यांना ताब्यात घेवून २४ जनावरे व आयसर ट्रक तसेच इतर साहित्य यांची एकुण कि. २७,६०,१२०/- रू जप्त केले.
नाव आरोपी : १) चालक मो. शाकीर वल्द मा. हनिफ खान रा. वार्ड क ३ खांखरा पो र सिल्ललीस थाना कुरई जिल्हा शिवनी बालाघाट मध्यप्रदेश २) क्लीनर बिलाल जाकीर कुरेशी रा. मरकीन मस्जीद जवळ रा. वार्ड क ११ रहातगढ़, भोपाल मध्यप्रदेश ३) फरार आरोपी इमरान यासीम खान रा. देवरी मध्यप्रदेश सिवनी
सदर प्रकरणी फिर्यादी नामे सरतर्फे सहायक पोलीस निरीक्षक अमित तिर्थराज पांडे रा. विषेश पोलीस पथक ना.प्रा यांचे रिपोर्टवरुन पो.स्टे. कन्हान येथे कलम 11 (1) (aa), 11 (a1) (da). 11 (a1)(ae)11(1a) (fa) 11(1)(1) 9. 109, 34 प्राणी संरक्षण कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हयाचा तपास एएसआय गणेश पाल हे करीत आहे.
सदरची कारवाई नागपुर ग्रामीण जिल्हयाचे पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार (भा.पो.से.), तसेब अपर पोलीस अधीक्षक डॉ. श्री संदीप पखाले, यांचे आदेशाने सहायक पोलीस निरीक्षक अमित तिर्थराज पांडे, सोवत स्टाफ पोलीस हवालदार ललित उईके, शुभम मोरोकर, पोलीस नाईक प्रणय बनाफर, पोलीस अंमलदार कार्तिक पुरी, बालाजी बारगुले, व त्यांचे स्टॉफ ने पार पाडली.