संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कन्हान :- भारतीय कलाकार शाहीर मंडळ ऑल इंडिया व्दारे छत्रपती शिवाजी महाराज, श्री विश्वकर्मा, संत गाडगे बाबा, संत रविदास, लोकशाहीर वस्ताद स्व. भिमराव बावनकुळे गुरुजी यांची संयुक्त जयंती उत्सव व भव्य कलाकार मेळावा कुलदिप मंगल कार्या लय रायनगर कन्हान येथे आयोजित केला आहे.
शुक्रवार (दि.१) मार्च २०२४ ला सकाळी ९ ते ६ वाजे पर्यंत संतांची संयुक्त जयंती व भव्य कलाकार मेळाव्याचे उद्घाटक नरेश बर्वे अध्यक्ष इंटक युनियन नागपूर क्षेत्र, सहउद्घाटक चंद्रपाल चौकसे पर्यटक मित्र रामधाम मनसर, प्रमुख अतिथी प्रकाश जाधव माजी खासदार रामटेक, आशिष जयस्वाल आमदार रामटेक, राजेंद्र भि. बावनकुळे अध्यक्ष भार तीय कलाकार शाहिर मंडळ ऑल इंडिया यांच्या अध्यक्षेत होणार आहे.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे डॉ. बबनराव तायवाडे राष्ट्रीय अध्यक्ष ओबीसी महासंघ नागपूर, करुणा आष्टणकर अध्यक्षा कन्हान, देवराव रडके माजी आमदार, सुरेश ठाकरे शिवसेना (उबाठा), राधे श्याम हटवार, विशाल बरबटे, विजय हटवार राष्ट्रीय अध्यक्ष नमो नमो मोर्चा भारत, हुकुमचंद आमधरे सभा पती मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती, व्यंकटेश कारे मोरे जि.प. सदस्य, ज्ञानेश्वर वांढरे कवि अध्यक्ष विदर्भ साहित्य संघ शाखा कामठी, जिवन मुंगले सामाजिक कार्यकर्ता, राजुभाऊ हिंदुस्तानी संपादक विदर्भ पथ, मोतीराम रहाटे अध्यक्ष मराठा सेवा संघ, वामन देशमुख तेली समाज कांद्री, राजु पोलकमवार, माजी नगर सेवक, लोकेश बावनकर युवा सेना जिल्हा प्रमुख, शंकर चाहांदे माजी नगराध्यक्ष कन्हान, चंद्रशेखर अर. गुल्लेवार अध्यक्ष तेजस संस्था, मुकेश चकोले कर्णिका एको शेतकरी उत्पादक संस्था कामठी, संजय कनोजिया सामाजिक कार्यकर्ता, नाना उराडे संताजी सामाजिक संघटना रामटेक आदीच्या प्रमुख उपस्थित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. संताच्या संयुक्त जयंती उत्सव व भव्य कलाकार मेळाव्याला परिसरातील शाहीर, लोक कलाकार सह नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित राहुन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. असे आवाहन राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय कलाकार शाहीर मंडळ ऑल इंडिया, सदस्य वृध्द कलावंत मानधन समिती नागपूर, आकाशवाणी व कैसेट सिंगर शाहीर राजेंद्र भि. बावनकुळे हयांनी केले आहे.