– पोलीस स्टेशन केळवदची कारवाई
केळवद :-दिनांक २१/१२/२०२३ रोजी पोलीस स्टेशन केळवद येथील स्टाफ पो. स्टे केळवद परिसरात पेट्रोलिंग करीत असताना मुखबीरव्दारे माहीती मिळाली की, साईखेडा (एम. पी) कडुन खुर्सापारकडे एक लाल रंगाचे ट्रॅक्टर मध्ये अवैध्यरित्या विनापरवाना गौणखनिज रेतीची चोरटी वाहतुक होत आहे, अशी खात्रीशिर खबर मिळाल्याने पोलीस स्टेशन केळवद येथील स्टाफ यांनी मौजा खुर्सापार येथील शिव मंदीर जवळ साईखेडा (एम. पी) कडुन खुर्सापारकडे येणाऱ्या डांबरी रोडवर दिनांक २१/१२/२०२३ चे १८/०५ वाजता दरम्यान नाकाबंदी करीत असताना साईखेडा (एम.पी) कडुन महिंद्रा ट्रॅक्टर क्र. एम. पि- २८/ए.डी-०६३१ व लाल रंगाची लागलेली ट्रॉली एच.-३१/ए.एच-२८७६ येतांना दिसुन आल्याने ट्रॅक्टर चालकास थांबण्याचा ईशारा देवुन ट्रॅक्टर थांबवुन चालकाला त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने आपले नाव गुलाब बारकु उईके, वय ३० वर्ष, रा. रेमंड बोरगाव वार्ड क्र. १२, गॉड मोहल्ला तह. सौसर जि. छिंदवाडा (एम.पी) असे सांगितले. ट्रॉलीची पाहणी केली असता त्यात एक ब्रास रेती किंमती ५०००/- रू. नी मिळुन आल्याने त्यास रेतीबाबत परवाना (रॉयल्टी) विचारली असता परवाना (रॉयल्टी) नसल्याचे सांगितले. सदर आरोपीने रेली ही अवैध्यरित्या संगम सावंगा येथील नाल्यातुन आणलेली आहे असे सांगितले. सदर ट्रॅक्टर ट्रॉली मंधिल रेतीबाबत त्यांचेकडे कोणताही शासकीय परवाना नसल्याने महिंद्रा ट्रॅक्टर क्र. एम. पि- २८/ए.डी-०६३१ व ट्रॉली एम. एच-३१/ए.एच-२८७६ किमती ६,००,०००/-रू. व एक ब्रास रेती किंमती ५,०००/- रू असा एकुण ६,०५,०००/- रूपयाचा मुद्देमाल आरोपी कडुन घटनास्थळी जप्त केला, महिंद्रा ट्रॅक्टर क्र. एम. पि- २८/ए. डी-०६३१ व ट्रॉली एम.एच-३१/ ए.एच-२८७६ चा चालक आरोपी नामे गुलाब बारकु उईके, वय-३० वर्ष रा. रेमंड बोरगाव वार्ड क्र. १२, गॉड मोहल्ला तह. सौसर जि. छिंदवाडा (एम. पी) हा आपले ट्रॅक्टर ट्रॉली मध्ये गौणखनिज विनापरवाना शासकीय संपत्तीची चोरी करून वाहतुक करतांना मिळुन आल्याने आरोपीविरूद्ध कलम ३७९ भादंवी सहकलम ४८ (८) जमिन महसूल अधिनियम १९६६ अन्वये गुन्हा नोंद केला आहे. सदर प्रकरणी सरकारतर्फे फिर्यादी नामे दिनेश मधुकर काकडे, पोस्टे केळवद यांचे रिपोर्टवरून पो.स्टे. केळवद येथे आरोपी विरूद्ध कलम ३७९ भा. दं. वि. सहकलम ४८ (८) महा. जमीन महसूल संहीता १९६६ अन्वये गुन्हा दाखल असुन पुढील तपास पोलीस हवालदार नरेश वरखडे हे करीत आहे.