नागपूर :- दिनांक २८.०१.२०२५ रोजी नागपूर शहर पोलीसांनी पोलीस ठाणे हद्दीत, महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये ०२ केसेस, तसेच एन.डी.पी. एस कायद्यान्वये ०३ केसेस असे एकुण ०५ केसेसमध्ये एकुण ०९ ईसमावर कारवाई करून रू. ६,५५,३२०/-रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये ०५ केसेसमध्ये ११ ईसमावर कारवाई करून रू. २१,४७०/-रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
वाहतुक शाखा पोलीसांनी मोटार वाहन कायद्यान्वये विविध कलमांखाली एकुण ५,३३६ वाहन चालकांवर कारवाई करून एकूण रू. ३.७८,८५०/-रू. तडजोड शुल्क वसूल केले आहे.
वरील सर्व मोहीम एकत्रितरित्या नागपूर शहर पोलीसांतर्फे राबविण्यात आल्या असून या पुढेही प्रभावीपणे कारवाई करण्यात येणार आहे. वाहन चालकांनी वाहन चालवितांना वाहतुकीचे नियम पाळुन वाहनासंबंधी सर्व कागदपत्रे जवळ बाळगावित असे नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे.