नागपूर :- दिनांक ०५/०५/२०२३ रोजी २०.०५ वा. सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नागपूर उपविभागात पेट्रोलिंग करीत असतांना गोपनीय खबर प्राप्त झाली की, काही इसम हे अशोक लेलँड दोस्त मालवाहू गाडी क्र. MH 32AJ 3544 या वाहनातून लोखंडी प्लेट्सची चोरटी वाहतुक करीत आहे. अशा मिळालेल्या माहिती वरून स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने सापळा रचून सातगाव फाटा येथे नाकाबंदी करून मालवाहू गाडीला पायलेटींग करणारी हिरो होंडा स्प्लेंडर क्र. एम.एच-३२ / ए. यु- ५३५१ चा चालक आरोपी नामे १) अरबाज सत्तारखान पठान, वय २१ वर्ष, रा. तळेगाव जि. वर्धा व अशोक लेलँड दोस्त मालवाहू गाडी क्र. MH 32 AJ 3544 चा चालक आरोपी नामे-२) मोहम्मद जलाल्लुधिन शराफत अली शेख, वय ३७ वर्ष, रा. सावजी नगर, पिपरी मेघे जि. वर्धा यांना थांबवुन मालवाह गाडीमध्ये असलेल्या मुद्देमालाबाबत सखोल विचारपुस केली असता उडवाउडविची उत्तरे दिली. आरोपीतांकडुन १ ) २७ नग लोखडी प्लेट वजन अंदाजे ०२ टन किमती अंदाजे ८०,०००/- २) अशोक लेलैंड दोस्त मालवाहू गाड़ी क्र. MH 32 AJ 3544 किंमती अंदाजे ३,००,०००/- ३) हिरो होंडा स्प्लेंडर क्र. एम.एच-३२ / ए.यु -५३५१ किमती अंदाजे ५०,०००/-रु. असा एकूण ४,३०,०००/- रूपयाचा मुद्देमाल जप्त करून सदर वाहने पोलीस स्टेशन बुट्टीबोरी येथे डीटेन करण्यात आली असुन संबंधित कागदपत्रे पुढील कायदेशीर कारवाई करीता पोलीस स्टेशन बुट्टीबोरी याचे ताब्यात देण्यात आले. त्यावरून असे उघडकीस आले की, नमुद आरोपीतांनी २७ नग लोखंडी प्लेट्सचा मुद्देमाल पोलीस ठाणे सेवाग्राम जि. वर्धा हद्दीतून चोरी केल्याचे निष्पन्न झाले असून पोलीस ठाणे सेवाग्राम जि. वर्धा येथील संबंधित चोरीचा गुन्हा उघडकीस आलेला असुन गुन्हयाचा पुढील तपास पोलीस ठाणे सेवाग्राम जि. वर्धा करीत आहे.
सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक आशिषस्सिंग ठाकुर, पोलीस हवालदार मिलींद नांदुरकर, विनोद काळे, मयुर ढेकळे, अमोल कुथे, पोलीस नायक उमेश फुलवेल, अमृत किनगे, रोहन डाखोरे यांच्या पथकाने पार पाडली.