उमरेड :-दिनांक ३०/०५/२०२३ रोजी मध्यरात्री दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पथक उमरेड उपविभागात पेट्रोलिंग करीत असता गोपनीय माहिती मिळाल्यावरून पोलीस ठाणे उमरेड परीसरातील मौजा तिरखुरा शिवारातील द टायगर प्यारडाइस रिसॉर्ट आणि वॉटर पार्क येथे banquet हॉल मध्ये साउंड सिस्टीमच्या आवाजावर मुलींना विभत्स कपडे घालून त्यांचेवर पैसे उधळत आहे. अशा खात्रीशीर मिळालेल्या माहिती वरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने सापळा रचून नमुद घटनास्थळी रेड केली असता रेड दरम्यान काही मुली अश्लील हावभाव करून कमी कपडे घालून नृत्य करताना व काही पुरूष नृत्य करणार्या मुलीवर पैसे उडवतांना मिळून आल्याने रेड केली असता सदर ठिकाणी ६ महिला व आरोपी नामे १) ललीत नंदलाल बैस, वय ५० वर्ष, रा. खात रोड भंडारा २) अभय रमेश भागवत, वय ४९ वर्ष, रा. रामायन नगरी खात नगरी भंडारा ३) डॉ. गोपाल सत्यनारायण व्यास वय ४८ वर्ष, रा. भंडारा ४) पंकज तुलसिराम हठीठेले, वय ३६ वर्ष, रा. समता नगर जरीपटका ५) मनिष ओमप्रकाश सराफ, वय ४७ वर्ष, एम.आय.डी. सी वर्धा ६) समिर कमलाकर देशपांडे, वय ५५ वर्ष, रा. प्लॉट नं. १०९ सुरेंद्रनगर नागपूर ७) रजत विनोद कोलते, वय ३२ वर्ष, रा. कोदामेंढी ८) मंगेश सुरेश हरडे, वय ३८ वर्ष रा. खरबी रोड नंदनवन नागपूर ९) आशुतोष शेषराव सुखदेवे, वय २८ वर्ष, रा. शिवनगर खामला नागपूर १०) केशव रविंद्र तरडे, वय ३५ वर्ष रा. कोदामेंढी ता. मौदा ११) पारस ज्ञानेश्वर हठीठेले वय २६ वर्ष, रा. वार्ड क्र. ०२ जमिल ले आउट गोधनी नागपूर तसेच रिसोर्ट मॅनेजर अरुण अभय मुखर्जी वय ४७ वर्ष रा. मनीष नगर फ्लॅट नं. १०१ ऑर्किड अपार्टमेंट असे एकूण १२ पुरुष वरीलप्रमाणे कृत्य करीत असतांना मिळून आले. त्यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन उमरेड येथे कलम २९४, ११४, ३४ ना.द.वि. सहकलम १३१, (अ) ३३ (अ) ११०, ११२, ११७ मु. पो. सहकलम ६५ (अ) सदाका कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. आरोपीतांकडुन १) नगदी १,३०, ३००/- रू. साउंड सिस्टीम, विदेशी दारू, लॅपटॉप २ व इतर साहित्य असा एकुण ३,७२,३२४/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीतांना पुढील कायदेशीर कारवाई करीता पोलीस स्टेशन उमरेड यांचे ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक नागपुर ग्रामीण विशाल आनंद (भा.पो.से) तसेच अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांचे मार्गदर्शनात परी सहाय्यक पोलीस अधीक्षक अनिल मस्के (भा. पो. से.) परी पोलीस उपअधीक्षक झालटे (म.पो.से.), स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, पोलीस उपनिरीक्षक आशिष मोरखेडे, पोलीस हवालदार मिलींद नांदुरकर, अरविंद भगत, नरेंद्र पटले, पोलीस नायक बालाजी साखरे, अजीज शेख, मयूर ढेकले, अमृत किनगे, रोहन डाखोरे, सत्यशील कोठारे, महिला पोलीस नायक स्वाती हिंडोरिया, चालक आशुतोष लांजेवार यांनी पार पाडली.
पोलीस स्टेशन उमरेड हद्दीत अश्लील डान्स करणाया ०६ महिला व १२ पुरुषांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com