जनावरांची अवैधरीत्या वाहतुक करणाऱ्या आरोपीताविरूद्ध कारवाई

देवलापार :- अंतर्गत ०१ किमी अंतरावर मौजा पोलीस स्टेशन देवलापार हायवे क्र. ४४ येथे दिनांक ०४/१०/२०२३ मे २२.२० वा. ते २२.५० वा. दरम्यान देवलापार पोलीसांना गुप्त माहिती मिळाली की, मौजा पोलीस स्टेशन देवलापार हायवे क्र. ४४ रोडवर काही इसम विनापरवाना व अवैधरीत्या जनावरांना निर्दयतेने कोंबुन वाहतुक करीत आहे. अशा मिळालेल्या गुप्त माहिती वरून देवलापार पोलीस पथकाने नाकाबंदी केली असता ६ चक्का आयसर क्र. UP. 77. AT4141 चा चालक आरोपी १) मोहम्मद तनविर भुरे (खान) वय ३३ वर्ष याने आपल्या साथीदार २) मोहम्मद संजात मो. आझाद, वय २२ वर्ष, ३) आरीफ मो. रियाझ अहमद, वय २५ वर्ष रा. तिन्ही रा. इसलाम नगर बाबरपुर ता. अजितमहल जि. औरया राज्य (उ.प्र.) यांचेसह आपल्या ताब्यातील चक्का आयसर क्र. UP 77 AT 4141 या वाहनामध्ये गोवंश जनावरांना अत्यंत कुर व निर्दयतेने वाहन कोंबुन आखुड दोरीने पाय व तोंड दाबुन चारा पाण्याची सोय न करता दाटीवाटीने अपुरे जागेत कोंबून कत्तलीसाठी अवैधरित्या वाहतुक करून घेवुन जातानी मिळून आल्याने त्या गाडीतील जनावरांची पाहणी केली असता गाडीमध्ये १) ०८ नग काळे रंगाचे गोवंश बैल प्रत्येकी किमती १५,०००/- प्रमाणे एकुण किंमती १,२०,०००/- (२) ०२ नग पाढरे रंगाने गोवंश बैल प्रत्येकी किंमती १५,०००/- प्रमाणे एकूण किंमती ३०,०००/–रु (३) ०८ नग फिकट काळपट रंगाचे गोवंश बैल प्रत्येकी किमती १५,०००/- रू प्रमाणे एकूण किमती १,२०,०००/- (४) ०४ नग लाल रंगाचे गोवंश बैल प्रत्येकी किमती १०,०००/- रू प्रमाणे एकूण किंमती ४०,०००/- (५) ०२ नग काळे व ०२ नग पांढरे रंगाचे गाई प्रत्येकी किमती १०,०००/- रु. प्रमाणे एकुण किंमती ४०,०००/- रू (६) ०१ नग काळे रंगाचा बैल व ०१ लाल रंगाची गाय मृत्यु झालेला प्रत्येकी किमतीप्रमाणे एकूण किंमती ००.०० अशा एकूण ३,५०,०००/- रूपयाचे गोवंश जनावरे दिसल्याने सदर गोवंश जनावरे हे नमुद६ चक्का आयसर क्र. UP 77 AT-4141 किंमती १२,००,०००/- रु. व यातील एकुण २६ नग जिवंत गोवंश जनावरे व ०२ नग नृत्य गोवंश जनावरे अशी किंमती अंदाजे ३,५०,०००/- रू अशा एकूण १५,५०,०००/- रूपयाचा मुद्देमाल आरोपीतांकडून जप्त करण्यात आला आहे.

सदर प्रकरणी सरकारतर्फे फिर्यादी नाने- पोशी २३३९ सचिन भगवान येडकर पोस्टे देवलापार यांचे रीपोर्टवरून पोस्टे देवलापार येथे आरोपाताविरुध्द कलम २७९ ४२९ ३४ भादवी सहकलम ११ १) (प) (ड) (च) प्राण्यांना निर्दयतेने वागणूक प्रतिबंधक अधिनियम १९६० सहकलम ५ (अ) ९ महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९९५ सहकलम ११९ सहकलम ४/१२२, १८४ मोवाका, कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोउपनी गायकवाड हे करीत आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पो.स्टे. रामटेक हद्दीमधील मरारवाडी गावाजवळ जंगलात जुगार अड्डयावर धाड

Sat Oct 7 , 2023
– स्थानिक गुन्हे शाखा, नागपुर ग्रामीण ची कारवाई  रामटेक :-दिनांक ०५/१०/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नागपूर ग्रमीण हद्दीत अवैध धंद्यावर रेड संबंधाने पेट्रोलिंग करीत असतांना पोलीस स्टेशन रामटेक परीसरातील पो.स्टे रामटेक हद्दीतील मगरवाडी गावाजवळ जंगलात काही इसम हे तासपत्यावर पैशाची बाजी लावुन हारजीतचा जुगार खेळत असल्याची गोपनिय माहिती पथकास प्राप्त झाले त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने मरारवाडी गावाजवळ जंगलात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com