रेती चोरी करणाऱ्या आरोपीताविरुद्ध कारवाई

कुही :- दि. १४/०२/२०२४ चे सकाळी ०५/०० वा. दरम्यान पोलीस स्टेशन कुही येथील स्टाफ पोलीस स्टेशन कुही हद्दीत खाजगी वाहनाने पेट्रोलिंग व अवैध धद्यावर कार्यवाही करिता पेट्रोलिंग करीत असता गुप्त बातमीदाराद्वारे माहिती मिळाली कि, एक पिवळ्या रंगाचा टिप्पर हा उमरेड कडुन नागपुरकडे टिप्परमध्ये रेती भरुन घेऊन जात आहे. अशा माहितीवरुन चांपा टोल नाका येथे नाकाबंदी करित असता उमरेड कडुन नागपुरच्या दिशेने एक पिवळ्या रंगाचा १० चक्का टिप्पर क्र. MH-49/1136 हा येतांनी दिसल्याने त्याला हात इशारे करुन थांबवुन टिप्परची पाहणी केली असता त्यामध्ये ६ ब्रास रेती किंमती ३६,०००/- रु. चा मुद्देमाल मिळुन आल्याने रेतीचावत चालक यास परवाना (रॉयल्टी) दाखविण्यास सांगितले असता कोणताही परवाना नसल्याचे सांगितल्याने टिप्पर चालक यास त्याचे नाव गाव पत्ता विचारला असता कार्तीक रमेश धनपोटे, वय २५ वर्ष रा. सिरसपा ता. पवनी जि. भंडारा असे सांगितले. सदर टिप्परमधिल रेतीचावत विचारणा केली असता सदर रेती ही टिप्पर क्र. MH-49/1136 चा मालकांच्या सांगण्यावरुन रेतीची वाहतुक करित असल्याचे सांगितले, आरोपीकडुन टिप्पर क्र. MH-49/1136 किंमती १५,००,०००/- रु. व ६ ब्राँस रेती किंमती ३६,०००/- रु. असा एकुण १५,३६,०००/- रु चा मुद्देमाल आरोपी टिपर चालक याच्या ताब्यातुन जप्त करण्यात आला. आरोपीविरूद्ध पोस्टे कुही येथे कलम ३७९, १०९ भा.द.वी. सहकलम ४८ (७), ४८ (८) महा. ज.म. कायदा सहकलम ४,२१ खाणी आणी खनिजे अधि. १९५७ सहकलम ३ सार्वजनिक मालमत्तेचे नुकशान प्रतिबंधक अधि. १९८४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलीस अधिक्षक रमेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी उमरेड विभाग राजा पवार, पोस्टे कुही येथील ठाणेदार सपोनि अमितकुमार आत्राम, पो. हवा. चांगदेव कुथे, पोलीस नायक प्रविण जावरकर, पोलीस अंमलदार अरविंद ठाकरे नेमणुक उपविभागिय पोलीस अधिकारी कार्यालय उमरेड विभाग उमरेड यांनी केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पोस्टे नरखेड हद्दीत अवैधरित्या मोहफुल गावठी दारू काढणाऱ्या इसमांवर कायदेशिर कार्यवाही

Fri Feb 16 , 2024
नरखेड :- पोलीस अधिक्षक नागपुर जिल्हा नागपुर ग्रामिण याचे आदेशाने दि. १४/०२/२०२४ रोजी देवळी नरखेड, मौजा नरखेड टाउन, पिठोरी नरखेड येथे मोहाफूल गावठी दारू गाळणाऱ्या इसमांवर कार्यवाही करण्यात आली. अवैधरित्या मोहाफुल गावठी दारु काढणारे एकुण ०३ आरोपी हे मोहफुल रसायन सडवा बाळगुन मोहाफुलाची गावठी दारूची रनिंग भट्टी काढताना मिळुन आले. आरोपीचे ताब्यातून मोहाफुल दारूने एकूण ४९ लिटर मोहाफुल गावठी दारू […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com