नागपूर :- शासनाकडून प्रतिबंधीत नायलॉनचा सरास वापर होत असल्यामुळे पोलीस अधीक्षक नागपुर ग्रामीण हर्ष ए. पोद्दार यांनी सर्व प्रभारी ठाणेदार यांना नायलॉन मांजावर कायदेशीर कार्यवाही करण्याचे आदेश दिले, त्या अनुशंगाने विविध पोलीस स्टेशन अंतर्गत नायलॉन मांजाची विक्री आणि वापर करणान्या इसमाविरूद्ध कारवाई करण्यात आलेली आहे ते खालीलप्रमाणे आहे.
दिनांक ११/०१/२०२४ रोजी पोलीस स्टेशन केळवद हद्दीत स्टॉफ पेट्रोलिंग करीत असताना मुखबिरद्वारे मिळालेल्या खबरे वरुन मौजा केळवद वाजार चौक मध्ये आरोपी नामे सिराज शेख रा. वार्ड क्र ०१ केळवद याचे ताब्यातून पर्यावरणास अपायकारक असणारा प्रतिबंधीत नायलॉन मांजा मिळून आला. आरोपीचे पतंगाचे दुकानाची कायदेशिर झडती घेतली असता त्याचे काउन्टरचे खाली एका पांढरे रंगाचे प्लास्टीक बोरीमध्ये १) MONO KITE नायलॉन मांजाचे २१ नग मोठी चक्री प्रत्येकी किंमती १०००/- प्रमाणे किंमती २१,०००/- रुपये, २) GOLD नायलॉन मांजाचे १४ नगे मोठी चक्री प्रत्येकी किंमती १०००/-रू. प्रमाणे किंमती १४,०००/- रुपये, ३) ३ नग नायलॉन मांजाची लहान चक्री प्रत्येकी किंमती अंदाजे ५००/-रू. प्रमाणे किंमती १,५००/- रुपये असा एकुण किमती ३६,५००/- रू चा मुद्देमाल नायलॉन मांजा मिळुन आल्याने आरोपीविरुद्ध पो.स्टे ला कलम ५, १५ पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ सह कलम १८८ भादोंव प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच पोस्टे अरोली हद्दीत मौजा कोदामेंढी येथे दिनांक १०/०१/२०२४ रोजी फिर्यादी यांना गुप्त बातमीदारां कडुन खवर मिळाली की, आरोपी नामे राजा सलाम शेख, वय २७ वर्ष, रा. वार्ड नं. ३ कोदामेंढी ता. मौदा याचे राहते घराची झडती घेतली असता, घराचे हॉलमधील एका टेवल वरील पंतगच्या बाजूला पर्यावरणास अपायकारक असणारा प्रतिबंधक नायलॉन मांजा मिळून आला. त्याने सदर मांजा हा पंतग उडविण्या करीता आणले होते असे सांगितले. तसेच त्यास सदरचा नायलॉन मांजा कोठून आणला होता याबाबत विचारपुस केली असता त्याने दोन वर्षी पतंग उडविण्या करीता नागपूर येथील गांधीबाग परिसरातून एका दुकानातून तो नायलॉन मांजा आणले होते. परंतु त्या दुकानाचे नाव व पुर्ण पत्ता त्याला माहीती नसल्याचे सांगितले, आरोपीकडुन १) एक लाकडी दांडा व काळया रंगाचे प्लॅस्टीक चक्रीत गुंडाळलेला काळया रंगाचा प्रतिबंधक नायलॉन मांजा ०१ नग किंमती ६,००/-रू. मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर आरोपी राजा सलाम शेख वय २७ रा. कोदामेंढी ता. मौदा याने शासनाने नायलॉन मांजा बाळगण्यास व वापरण्यास बंदी घातलेली असतांना सुध्दा शासनाने मनाई आदेशाचे उल्लघंन करून नायलॉन मांजा पतंग उडविण्या करीता बागळून मिळून आल्याने त्याचे विरूध्द कलम १८८ भा.दं.वि. सहकलम ५, १५ पर्यावरण कायदा १९८६ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोस्टे नरखेड अंतर्गत पेठ विभाग नरखेड येथे दिनांक १०/०१/२०२४ रोजी आरोपी नामे- नरेश विठ्ठलराव बारई, वय ५३ वर्ष, रा. नरखेड पेठ विभाग याचे घराचे कायदेशिररित्या झडती घेतली असता त्यांचाकडे प्रतीवधित नायलॉन मांजा मिळून आला १ मोनो काईट कंपनीची मांजा चक्री ज्याला नायलॉन मांजा गुंडाळलेला आहे ५०० ग्रॅम जप्त मालाची संख्या प्रती नग किंमत ५००/-रु प्रमाणे एकुण किमत २५००/-रु चा माल जप्त करण्यात आला.
पोस्टे कोंढाळी अंतर्गत मौजा कोंडाळी येथे दिनांक १०/०१/२०२४ रोजी पोस्टे कोंडाळी येथील स्टाफ है पेट्रोलींग करीत असता मुखबीर दवारे मिळालेल्या माहिती वरून आरोपी नामे करण उर्फ किरण फुलचंद शाहु वय ४८ वर्ष, रा. उमाटे नगर कोंढाळी याची डाडती घेतली असता आरोपी जवळ २ नग मोठी चकी किंमती ३०००/- रू व १ नग नायलॉन मांजाची लहान चकी किमती अंदाजे ५००/- रू असा एकुण ३५००/- रु. चा मुद्देमाल मिळुन आला.
सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक हर्ष पोहार (भा.पो.से), अपर पोलीस अधिक्षक डॉ. संदिप पखाले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन केळवद येथील सहायक पोलीस निरीक्षक राकेश साखरकर, पोलीस स्टेशन कोंढाळी येथील सहायक पोलीस निरीक्षक पंकज वापोडे, पोलीस स्टेशन नरखेड येथील सहायक पोलीस निरीक्षक कृष्णा तिवारी, पोलीस स्टेशन अरोली येथील सहायक पोलीस निरीक्षक निशांत फुलेकर यांनी पार पाडली.