जनावरांची अवैधरीत्या वाहतुक करणाऱ्या आरोपीविरुद्ध कारवाई

मौदा :- अंतर्गत १७ किमी अंतरावर नेरला येथे दिनांक १४/०७/२०२३ चे दरम्यान मौदा पोलीसांना गुप्त माहिती मिळाली की, नेरला येथे एक इसम विनापरवाना व अवैधरीत्या जनावरांना निर्दयतेने कोंबुन वाहतुक करीत आहे. अशा मिळालेल्या गुप्त माहिती वरून मौदा पोलीस पथकाने नाकाबंदी केली असता संशयीत बोलेरो पिकअप गाडी वाहन मिळून आल्याने त्या वाहना जवळ जावून त्याची पाहणी केली असता सदर वाहनात आरोपी विनोद हरीचंद्र खेडकर रा. भुगाव वार्ड नं. ०१ मौदा हा बोलेरो पिकअप गाडी क्र. एम. एच. ४०/ सी. एम. ०५१५ किंमती अंदाजे ३,००,०००/- मध्ये ५ बैल किंमती अंदाजे ७५,०००/- रूपयाचा मुद्देमाल ज्यांच्या मुसक्या आवळुन वाहनाच्या पल्ल्याला जनावरांना हालचाल करता येणार नाही अशा पदधतीने बांधुन त्यांना कुरतेची वागणुक देत वाहतुक करतांना मिळुन आले. आरोपीच्या ताब्यातून असा एकूण वाहनासह ३,७५,०००/- रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर प्रकरणी सरकारतर्फे फिर्यादी पोलीस हवालदार भगवान चदिवार पोस्टे मौदा यांचे रोपोर्टवरून पोस्टे मौदा येथे आरोपीविरुद्ध कलम ५ अ ९ महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम, ११ (१) (ड) प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम कायदाअन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस नायक श्रीराम डोईफोडे व नं. २१४९ पोस्टे मौदा हे करीत आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

ऑनलाइन फसवणुक करणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

Sun Jul 16 , 2023
बुट्टीबोरी :- अंतर्गत ०२ कि. मी अंतरावरील जुनी वस्ती बुट्टीबोरी येथे दिनांक १४/०७/२०२३ चे १९.४० वा. पर्यंत फिर्यादी नामे जिवनलाल हरिशंकर तिवारी, वय ४६ वर्ष, रा. जुनी वस्ती बुट्टीबोरी यांनी मोबाईलचे फेसबुकवर प्रिमीयम डि. डि. पावर सेवर मेक्स या प्रोडक्सची अँड पाहीली व प्रोडक्स पसंत आले म्हणून ऑनलाईन ऑर्डर केले. दि. ११/०७/२०२३ ला shiprocket tx-shprkt कंपनी ब्ल्यु डार्ट कंपनी व्दारा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com