कळमेश्वर :- अंतर्गत मौजा कळमेश्वर बंजारा माता मंदीर १ किमी पूर्व यातील पिडीता वय २० वर्ष हीचा यातील आरोपीने पाठलाग करून रस्त्यात अडवुन शरीर सुखाची मागनी करून, हात धरून विनयभंग केला व “जर तु लग्न केले नाही, तर तुला व तुझे आईला मारून टाकीन, अशी धमकी दिली.
सदर प्रकरणी फिर्यादी पिडीता हीचे रिपोर्टवरुन आरोपी नामे चेतन अशोक नागपुरे वय २८ वर्ष रा. उगी तह कळमेश्वर याचे विरुध्द पोस्टे कळमेश्वर येथे कलम ३५४(अ) (ड), ३.४९, ५०४, ५०६ भादवी अन्वयें गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हयाचा पुढील तपास पो हवा दयाराम करपाते पोस्टे कळमेश्वर हे करीत आहे.