मुंबई, दि. 6 – महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2021 संयुक्त पेपर 1 करीता आज रोजी आयोजित परीक्षेच्या विविध उपकेंद्रांच्या ठिकाणी आयोगाच्या दक्षता पथकाने संशयित उमेदवारांची तपासणी केली. त्यामध्ये पुणे जिल्हा केंद्रांवरील नऱ्हे येथील उपकेंद्रावर केवलसिंग चैनसिंग गुसींगे या उमेदवाराकडे गैरप्रकाराच्या उद्देशाने लपवलेले मोबाईल फोन व ब्लूटूथ इयर फोन इत्यादी साहित्य सापडले. सदर उमेदवारावर आयोगाच्या कार्यालयाकडून कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.आयोगाने याविषयी ट्विटही केले आहे.
राज्य लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत गैरप्रकार करणाऱ्या उमेदवारांवर कारवाई
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com