खापरखेडा :-दिनांक ३०.०३.२०२४ रोजी पोलीस अधिक्षक नागपुर ग्रामीण यांनी आगामी सार्वत्रिक लोकसभा निवडणुक च्या अनुषंघाने नागपुर ग्रामीण परीसरात अवैध जुगार खेळणा-या आरोपींवर रेड करण्याचे आदेश दिले असता नागपुर ग्रामीण जिल्हयातील पोलीस स्टेशन खापरखेडा येथे अवैधरित्या जुगार खेळणा-या आरोपींवर रेड करून सट्टा पट्टी साहित्य व नगदी ४८६०/- रू चा माल मिळुन आला तसेच आरोपी नामे १. मयूर शंकर तडोकर वय ४० वर्ष रा वार्ड क्रमांक ४ खापरखेडा सावनेर २) शंकर सुधाकर कुंभारे वय ४८ वर्ष रां. पांजरा कोराडी ३) बंटी स्वामी उर्फ अण्णा वय ४२ वर्ष रा. महादुला कोराडी नागपूर यांचेवर कारवाई करून पोलीस स्टेशन खापरखेडा येथे नमुद आरोपींवर कलम १२ (अं) महाराष्ट्र जुगार कायद्याखाली कारवाई करण्यात आली आहे.
सदरची कार्यवाही हर्ष पोद्दार पोलीस अधिक्षक नागपूर ग्रामीण, रमेश धुमाळ अपर पोलीस अधिक्षक, ना ग्रा यांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे खापरखेडा येथील ठाणेदार पोलीस निरीक्षक धनाजी जळक, सफाँ कैलाश पवार, पोलीस नाईक प्रणय बनाफर यांनी केली.