एसीपी पथकाची ओव्हरलोड वाळू वाहनावर धाड

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या जयस्तंभ चौक मार्गे कन्हान हुन कामठी कडे ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या चार वाळू ट्रक वर एसीपी पथकाने सकाळी साडे सहा दरम्यान धाड घातली असता घटनास्थळाहून एक ट्रक पसार झाला तर तीन ट्रक ताब्यात घेण्यात आले या तिन्ही ट्रक मध्ये रॉयल्टीत नमूद असलेल्या क्षमतेपेक्षा अधिक वाळू असल्याचे निष्पन्न झाले असता पुढील कार्यवाहिस्त्व हे तिन्ही ट्रक कामठी पोलीस स्टेशन ला लावण्यात आले.

जप्त तीन ट्रक मध्ये एम एच 40 सी टी 6600,एम एच 40 सी एम 7754,एम एच 40 सी क्यू 1525 चा समावेश असून तिन्ही ट्रक मध्ये क्षमतेपेक्षा अधिक वाळू भरून असल्याचे निदर्शनास आले असून ट्रकचालक जयेंद्र ठाकूर वय 45 वर्षे रा वाघधरा वाडी कन्हान, पंकज मडावी वय 35 वर्षे रा गोदनी तसेच सुरेश मेश्राम वय 40 वर्षे रा लहान आजनी कामठी ला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील कारवाही सुरू आहे.ही यशस्वी कारवाही एसीपी पथक,सहाय्यक फौजदार संजय पिल्ले,मंडळ अधिकारी संजय कांबळे आदींनी केली असून पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Nagpur Division of Central Railway Celebrates World Environment Day with Enthusiasm

Fri Jun 7 , 2024
Nagpur :-The Nagpur Division of Central Railway celebrated World Environment Day with great enthusiasm, embracing the theme “ONLY ONE EARTH.” A series of events were organized across the division, witnessing active participation from officers and staff. The day commenced with Pledge Ceremony at the Divisional Railway Office, where staff members pledged their commitment to environmental conservation. The ceremony was led […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com