आचार्य महाश्रमणजी यांचे नशामुक्ती कार्यात मोलाचे योगदान – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे :- “आचार्य महाश्रमणजी यांचे सद्भावना, नैतिकता व नशामुक्ती कार्यात मोलाचे योगदान आहे. ‘मनुष्य सेवा ही ईश्वर सेवा’ असे मानून कोट्यवधी लोकांना व्यसनातून मुक्त करण्याचे काम त्यांनी केले आहे. स्वयंसेवा, राष्ट्रसेवा, जीवनदान क्षेत्रात त्यांचे कार्य महत्त्वाचे आहे”, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

ठाणे येथे आयोजित आचार्य श्री महाश्रमण चातुर्मास प्रवेश स्वागत व अभिनंदन कार्यक्रमप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी खासदार राहुल शेवाळे, आमदार प्रताप सरनाईक, आमदार गीता जैन, यांच्यासह जैन समाजातील मुनी, प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. आचार्य  महाश्रमण यांच्या चातुर्मासासाठी ठाणे येथे आगमनानिमित्त यावेळी मिरवणूक काढण्यात आली.

“राज्य शासन गेल्या वर्षभरात दिवसरात्र काम करून राज्याच्या विकासासाठी कार्यरत आहे. तुमच्या नशामुक्ती कामाप्रमाणेच राज्य शासनाने ‘ड्रग मुक्त मुंबई’ मिशन हाती घेतले आहे. याकामी आपला सहयोग द्यावा”, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

ठाणे कल्याण येथील अंतार्ली गावात ‘महा हब’ साकारण्यात येणार, ५०० कोटी रुपयांची तत्वतः मंजुरी- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Thu Jun 29 , 2023
मुंबई :- राज्यातील इनोव्हेशन इको सिस्टीमवर आधारीत ‘महा हब’ ठाणे कल्याण येथील अंतार्ली गावात साकारण्यात येणार आहे. यासाठी ५०० कोटी रुपयांची तत्वतः मंजुरी देण्यात आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मंत्रालयात महा हब संदर्भातील बैठक पार पडली. या बैठकीला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव पराग जैन- नानौटिया, माहिती व जनसंपर्क […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!