– दिनेश दमाहे, मुख्य संपादक
नागपूर/भिवापुर – आज सकाळी भिवापुर ते नागभिड रोड वर असलेले भारत पेट्रोल पंप (पाटील पेट्रोल पंप) चे मालक दिलीप राजेश्वर सोनटक्के रा. दिघोरी नागपूर हे रात्री विक्री झालेल्या ईंधनाचे पैशाचा हिशोब करीत आपल्या पेट्रोल पंपाच्या कार्यालयात बसले होते या दरम्यान एक मोटार सायकलवर आपल्या चेहऱ्यावर दुप्पटा बांधुन तिन इसम पेट्रोल पंपावर आले आपली गाडी पेट्रोल पंपाच्या कार्यालय समोर उभी करुन कार्यालयात घुसुन त्यातील एक ईसमाने दिलीप राजेश्वर सोनटक्के यांना चाकुने सपासप पोटावर वार करण्यात सुरुवात केली व त्यामधील एक ईसमाने हातात बंदुक दाखवून जिवे मारण्याची धमकी देत तेथील उपस्थित असलेल्या कर्मचारी यांना तुम सब लोग यहा से भाग जावो अशी धमकी दिली व एक तेथील कर्मचारी राजेश्वर नान्हे यांना जखमी केले त्यामुळे तेथील इतर कर्मचारी वर्ग घाबरुन कार्यालयाचे बाहेर निघुन गेला. थोडया वेळात हल्ला करणारे तिघेही आपल्या मोटार सायकलने उमरेडच्या दिशेने निघुन गेले. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी कार्यालयात चे आत जावून पाहीले असता त्यांचे मालक दिलीप राजेश्वर सोनटक्के वय ६० वर्ष रा. दिघोरी नागपूर हे गंभीर जखमी अवस्थेत दिसून आले तसेच हिशोब करण्यात आलेले नगदी रुपये १,३४,०००/- रक्कम कॉऊंटरवर दिसून आले नाही. हल्ला करण्यात आलेले इसम हे आपल्या चेहऱ्यावर दुप्पटा बांधुन असल्याने त्यांना कोणीही ओळखून शकले नाही. सदर घटनेबाबत पोलीस स्टेशन भिवापुर येथे अप क्रमांक २१३ / २०२३ कलम ३०२,३९४,३९७,३४ भादवि सहकलम ३,२५ भाहका दाखल करण्यात आला.
घटना अत्यंत गंभीर स्वरुपाची असल्याने व आरोपी अनोळखी असल्याने नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद, यांनी संपुर्ण जिल्हयात अलर्ट घोषित केले विशेषतः पोलीस स्टेशन उमरेड यांना त्यांच्या हद्दीत नाकाबंदी लावुन आरोपीचा शोध घेण्यास निर्देश दिले असता अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदिप पखाले, पोलीस उप अधिक्षक (गृह) तसेच अतिरीक्त कार्यभार उपविभागीय पोलीस अधिकारी उमरेड विभाग संजय पुरंदरे यांचे मार्गदर्शनाखाली आरोपी शोध करिता स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, पोलीस स्टेशन भिवापूरचे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रमोद घोंगे तसेच सहायक पोलीस निरीक्षक भस्मे व पोलीस स्टेशन उमरेड चे पोलीस निरीक्षक प्रमोद घोंगे यांनी वेग वेगळे तपास पथक तयार करण्यात आले. पोलीस स्टेशन उमरेड हद्दीत उमरेड पोलीसांनी नाकाबंदी करण्यास सुरू केली असता घटने वर्णनाची मोटरसायकल अडविली असता त्यातून घटनेतील आरोपीतांनी हे मोटरसायकल सोडुन जंगलाकडे त्यांनी पळ काढला त्यातील एक आरोपी नागपूरकडे जाण्यास यशस्वी झाला असता. उमरेड पोलीसांनी नाकाबंदी तसेच जंगलात सर्च ऑपरेशन राबवुन १) शेख अफरोज उर्फ इमरान मौलाना शेख हनीफ वय ३३ वर्ष रा. रामचंद्र बाब मठाचे मागे मोठा ताजबाग नागपूर २) मोहम्मद वसीम उर्फ सोनु वल्द लालमोहम्मद अंसारी वय २७ वर्ष रा. ग्राम मंडई ता. लोहसिंगा जि. हजारीबाग झारखंड ह. मु. खरबी नागपूरयांना ताब्यात घेवुन त्यांचेकडुन लुटण्यात आलेली रक्कम १,३४,०००/- रू. हस्तगत केले नागपूर येथुन बाहेर राज्यात पळुन जाण्याच्या तयारीने असलेला तिसऱ्या आरोपी ३) शेख जुबेर शेख कयुम वय २५ रा. मलीक शाळेच्या समोर अख्तर ले आउट मोठा ताजबाग नागपूर याला मोठा ताजबाग हद्दीतून ताब्यात घेण्यात स्थानिक गुन्हे शाखेतील पथक यशस्वी झाले. तसेच त्याचेकडुन एक जिवंत काडतुस सुद्धा जप्त करण्यात आले. घटनेचा पुढील तपास पोलीस स्टेशन भिवापूर कडुन करण्यात येत असुन हत्या कोणत्या कारणाने करण्यात आली हे निष्पन्न होणे बाकी असुन आरोपीचा पोलीस कस्टडी प्राप्त करून सखोल तपास करण्यात येत आहे.