विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेत 1 ते 2 एप्रिल दरम्यान कॉन्सोरशियम 2023 तसेच टेड-एक्स कार्यक्रमाचे आयोजन

कन्सर्शिअम 2023 च्या समारोपीय कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री पियुष गोयल करणार संबोधित

नागपूर :- केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या अधीन नागपूरच्या उत्तर अंबाझरी मार्गावर स्थित विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था अर्थात व्हीएनआयटी येथे येत्या 1 ते 2 एप्रिल दरम्यान कँसर कॉन्सोरशियम-2023 या व्हीएनआयटी च्या उद्योजकता केंद्र – आंटरप्रनर्शिप सेलद्वारे आयोजित कार्यक्रमाचे आयोजन संस्थेच्या सभागृहात करण्यात आले असून दोन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाच्या समारोपीय कार्यक्रमाला 2 एप्रिल रोजी केंद्रीय वाणिज्य आणि व्यापार मंत्री केंद्र पियुष गोयल हे आभासी माध्यमातून संबोधित करणार आहेत अशी माहिती व्हीएनआयटीचे संचालक डॉ. प्रमोद पडोळे यांनी आज दिली.

कन्सर्शिअम 2023 चा उद्देश हा स्टार्टअप कल्चरला प्रोत्साहन देणे असून स्टार्ट अप्स, इंक्युबॅशन नावीन्यपूर्ण, संकल्पना असणारे उद्योजक यांना हा कार्यक्रम एक मंच उपलब्ध करून देणार आहे. यावर्षीच्या 15 व्या कॉन्सरशियम 2023 ची संकल्पना ‘थ्रायविंग बीयॉंड पॉसिबिलिटी’ अर्थात शक्यतांच्या पलीकडे अशी राहणार आहे या कन्सर्शिअमच्या दरम्यान स्टार्टअप एक्सपोर्ट विपणन क्षेत्रातील तज्ञांचे मार्गदर्शन त्याचप्रमाणे मनोरंजन क्षेत्रातील तंत्रज्ञानाविषयी परिसंवाद देखील होणार आहेत . या कार्यक्रमासाठी संस्थेच्या माजी विद्यार्थी संघ हा सर्व प्रकारचे सहकार्य करत असल्याचे देखील पडोळे यांनी सांगितल.

टेक्नॉलॉजी आंटरप्रनर्शिप डेव्हलपमेंट अर्थात टेड-एक्स व्हीएनआयटीचे या वर्षी पहिल्यांदाच आयोजन होणार असून या चर्चासत्राच्या तसेच मुलाखतीच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून उद्योग अभिनय तसेच इंटरियर डिझाईन यासारख्या क्षेत्रातील तज्ञ व्यक्ती यादरम्यान मार्गदर्शन करणार आहेत . 31 मार्च 2023 रोजी सायंकाळी 6.15 ते रात्री 9 दरम्यान उद्योजक परिमल काळीकर, अभिनेत्री त्रिधा चौधरी त्याचप्रमाणे डिझायनर क्षेत्रातील कार्यरत असणारे जिमी मिस्त्री हे टेड-एक्स या कार्यक्रमात आपले विचार मांडतील. टेड-एक्स व्हीएनआयटी या कार्यक्रमाची संकल्पना ‘नाण्याची तीसरी बाजू’ ही आहे.

याप्रसंगी या व्हीएनआयटी च्या उद्योजकता केंद्र – आंटरप्रनर्शिप सेलचे मुख्य कार्तिक बाळासुब्रमण्यम यांनी दोन्ही कार्यक्रमांच्या संकल्पनांचे अनावरण केले. या दोन दिवसीय कार्यक्रमादरम्यान विदर्भातील स्टार्टअप सुद्धा सहभाग घेणार असून व्हीएनआयटीचा फूडवेज नावाचा स्टार्टअप देखील यामध्ये सहभागी होणार आहे ज्याला वीस लाख रुपयांचा अनुदान स्टार्टअप इंडिया अंतर्गत मिळालेला आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com