पो.स्टे. कळमेश्वर :- दिनांक १७/०९/२०११ चे २३.४६ वा.च्या सुमारास यातील आरोपी नामे- विजय कवडु जाधव, वय ३३ वर्ष, रा. गोंडखैरी ता. कळमेश्वर जि. नागपूर याने आपल्या पत्नीचे मृतक नामे- आकाश गुलाब टोंगे, वय २० वर्ष रा. गोंडखैरी ता. कळमेश्वर जि. नागपूर याचे सोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून मृतकास आपल्या घरी बोलावुन त्यास नायलॉनच्या दोरीने गळा आवळून त्याचे डोके फरशीवर आपटुन त्याला तलवारीने मारुन जिवनाशी ठार केले.
सदर घटनेच्या अनुशंगाने फिर्यादी नामे दशरथ शंकरराव टोंगे, वय ४३ वर्ष रा. गोंडखैरी ता. कळमेश्वर जि. नागपूर यांनी येथे दिलेल्या तक्रारीवरून पो.स्टे. कळमेश्वर येथे अप. क्र. ६५५/२०१९ कलम ३०२ भादवि कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला होता. सदर प्रकरणाचे तपास तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक राजीव कर्मलवार यांनी तपास पूर्ण करून आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र तयार करून मा. जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर येथे सादर केले होते. आज दिनांक १५/०६/२०२३ रोजी मा. कोर्ट विद्यमान न्यायाधीश डी. जे. ०८ आर. एस. पावसकर यांनी वरील नमुद आरोपीला कलम ३०२ भादवि मध्ये आजिवन कारावास व १०,०००/- रु. दंड व दंड न भरल्यास ०३ वर्ष सश्रम कारावास अशी शिक्षा ठोठावली आहे.
सरकारच्या वतीने एपीपी लिना गजभिये यांनी काम पाहीले. कोर्ट कामात पैरवी अधिकारी म्हणून सफी / ८९ प्रमोद कड़वे पो स्टे कळमेश्वर यांनी मदत केली आहे.