नागपूर :- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हे पोलीस स्टेशन उमरेड अप. क्र. २५०/२४ फलम ३०२ भादंवी गुन्हयाचे समांतर तपास कामी उमरेड, नागपूर हद्दीत आरोपी शोधकामी फिरत असता मृतकचे नातेवाईक, व आरोपीचे नातेवाईक यांचेकडून मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी नामे महादेव उर्फ जग्गू रतन जाधव वय ३० वर्ष, रा. जुनोनी त. उमरेड जि. नागपूर हा आपले नातेवाईक सासू सुनिता चव्हाण राहणार गंगापूर तालुका कारंजा लाड जिल्हा वाशिम येथे पळून गेल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने लगेच मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी जाऊन आरोपीचा शोध घेतला असता आरोपी त्याचे नातेवाईकाकडे मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन गुन्हयाबाबत सखोल विचारपूस केली असता त्याने सांगितले की दिनांक ०८/६/२०२४ रोजी मी माझा मित्र मृतक नामे- नितेश कवडू जाधव व माझ्याकडे कामावर असलेला फरार आरोपी राजेश उर्फ राजा शामरावजी भोयर वय ३० वर्ष, रा. गावसुत तालुका उमरेड जिल्हा नागपूर आम्ही तिचेही मिळून दिवसभर दारू पिलो व सायंकाळी ८/०० ते ८/३० वा. मोहपा रोडनी आपले गावी माझे मोटरसायकल क्र. MH 40 CL 4345 नी जात असता मृतक याने माझे कडे काम करणारे राजेश उर्फ राजा यास गाला गालावर मारणे सुरू केले त्यामुळे माझे नोकराने मला गाडी थांवण्यास सांगितले असता मी बीपीएड कॉलेज उमरेड चे जवळ थांबलो असता मृतक याने मला सुद्धा धक्का देऊन जमिनीवर पाडले असता आम्हाला राग आला व चिडून जाऊन आम्ही दोघांनी मिळून मृतक यास मारहाण करून खाली पाडले व गोट्याने मारले मृतक खाली पडल्यानंतर त्याचे डोक्यावर जवळ पडला असलेला मोठा दगड त्याचे चेहऱ्यावर टाकला व त्यास जीवानिशी मारून आम्ही तिथून निघून गेलो.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर आरोपीस २४ तासाचे आत ताब्यात घेतले व गुन्हयाच्या पुढील अन्वेषण कामी पोलीस स्टेशन उमरेडचे ताब्यात देण्यात आले.
सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोद्दार (भापोसे), अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री ओमप्रकाश कोकाटे, पोलीस उपनिरीक्षक आशिष मोरखडे, बटुलाल पांडे, पोहवा अरविंद भगत, पोहवा गजेंद्र चौधरी, पोहवा रंजीत जाभव, पोहवा मयूर देकले पोशी राकेश तालेवार, चापोशी आशुतोष लांजेवार, चापोशी सुमित बांगडे यांनी पार पाडली.