महात्मा गांधी जयंतीला जिल्हाधिकारी, सिईओंच्या थेट ग्रामपंचायतीला भेटी. 

‘प्रशासन आपल्या दारी ‘, उपक्रमाने ‘सेवापंधरवडा ‘ ठरला लक्षवेधी

नागपूर  : ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता ‘, अभियानांतर्गत जिल्ह्यामध्ये 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंतच्या सेवापंधरवडा सुरु होता.आज पंधरवडयाच्या शेवटच्या दिवशी.२ ऑक्टोबरला जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व जिल्हा परिषद नागपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी अनेक गावांना भेटी देऊन या मोहिमेचा आढावा घेतला.

आज दोन्ही अधिकाऱ्यांनी दवलामेटी,कोतेवाडा, गुमगाव व वागधरा ग्रामपंचायत येथे दौरा केला. यावेळी आयुष्मान भारत कार्ड वाटप ,यशवंत घरकुल योजना,अटल बांधकाम आवास योजना,स्वच्छता हि सेवा उपक्रम, केंद्र व राज्य पुरस्कृत इतर योजना, पी.एम. किसान योजना यासह किमान ६५ विविध योजनांचा आढावा घेतला. ग्रामस्थांशी संवाद साधत अनेक प्रमाणपत्रांचे वाटप यावेळी त्यांनी केले.

या कार्यक्रमाला शिक्षण सभापती भारती पाटील , गटविकास अधीकारी राजनंदिनी भागवत, बाळासाहेब यावले गटविकास अधिकारी पंचायत समिती हिंगणा, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य हजर होते, हिंगणा येथे विविध गावचे सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी व सदर योजनेचे लाभार्थी उपस्थित होते .प्रधान मंत्री जण आरोग्य योजनेत नोंदणी केलेल्या लाभार्थयाचें आरोग्य कार्ड वितरण करण्यात आले. तसेच स्वच्छता ही सेवा उपक्रमांतर्गत प्रचार रथांना हिरवा झेंडा दाखविण्यात आला . तसेच अटल बांधकाम कामगार आवास योजना व इतर घरकुल योजनाबद्दल माहिती देण्यात आली व प्रधान मंत्री जण आरोग्य योजनेअंतर्गत १०० % आरोग्य कार्ड वाटपाचे उद्दिष्ट्य ग्रामपंचायतीने साध्य करावे,असे आवाहन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

प्रशासन आपल्या दारीला यश

नागपूर जिल्ह्यातील मंडळ स्तरावरील प्रशासन आपल्या दारी या पूरक अभियानाची नागपूर जिल्ह्यासाठी विशेष सुरुवात जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या सूक्ष्म नियोजनात करण्यात आले. यासाठी प्रत्येक तालुक्याला अधिकाऱ्यांना जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यामुळे ग्रामीण स्तरावर अनेक योजनांमधील 10 सप्टेंबर पर्यंतची प्रलंबित कामे मार्गी लागली. याचा दृश्य परिणाम ग्रामीण भागात दिसत असून या संदर्भातील आकडेवारी लवकरच जिल्हा प्रशासन जाहीर करणार आहे. आरोग्य, शिक्षण संजय गांधी निराधार सारख्या लाभाच्या योजना, ओळखपत्र,जातीचे प्रमाणपत्र, अशा अनेक सेवांचा लाभ ग्रामीण भागातील नागरिकांना झाला आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याने वेगवेगळे उपक्रम या काळात राबवले. परंतु नागपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कल्पनेतील ‘प्रशासन आपल्या दारी’ हे अभियान लक्षवेधी ठरले आहे.

या सर्व अभियानात प्रामुख्याने आयुष्यमान योजनेबद्दल जनजागृती करण्यात आली आहे. आयुष्यमान योजनेतून पाच लाखापर्यंतच्या विमा सामान्य कुटुंबाला मिळत असून या योजनेचा लाभ सामान्यतील सामान्य नागरिकांनी घ्यावा असे आवाहन गावागावात करण्यात आले आहे. याशिवाय पी. एम. किसान योजनेमध्ये यापुढे ईकेवायसी केल्याशिवाय कोणालाही लाभ मिळणार नाही. त्यामुळे या योजनेची ही प्रसिद्धी या अभियानात करण्यात आली. ग्रामीण भागातील सर्व नागरिकांना हक्काची घरे मिळावी, यासाठी अटल बांधकाम योजना संदर्भातही आग्रही भूमिका प्रशासनाने या काळात घेतली आहे.

याशिवाय आज नागपूर जिल्ह्यातील सर्व रेल्वे स्थानकांवर एक स्टेशन एक प्रॉडक्ट या अभियाना अंतर्गत जिल्हा ग्रामीण यंत्रणा उमेद कारागृह यंत्रणा तसेच मावींच्या विविध बचत गटांनी स्टॉल लावले होते जिल्हाधिकारी व सीईओ यांनी आज अजनी येथील स्टॉलला भेट दिली.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com