विनयभंग करून खंडणी मागणाऱ्या आरोपीस अटक

नागपूर :- दिनांक १०.०७.२०२३ ते दि. १७.०८,२०२३ चे २३.३० वा. चे दरम्यान पोलीस ठाणे मानकापुर हद्दीत राहणारी १८ वर्षीय फिर्यादी पिडीता हिची ओळख इंस्टाग्रामद्वारे आरोपी आजम रशीद खान वय २१ वर्ष रा. श्याम लॉन मागे, जाफर नगर, याचे सोबत ओडक होवून त्याचे मध्ये मैत्री झाली होती. आरोपीने फिर्यादीस पैश्याची आवश्यकता आहे. असे सांगुन पैसे घेतले व पुन्हा वारंवार पैश्याची मागणी केल्याने फिर्यादी हीने नकार दिला असता, आरोपीने फिर्यादीस अश्लिल शिवीगाळ करून तिला लज्जा येईल असे कृत्य केले. आरोपीने फिर्यादीस धमकी देवून फिर्यादीचे आयडी, जि. मेल आयडी स्वतः जवळ घेवुन तिचे कडुन एकूण १,५०,०००/- रू व सोन्याचे दागिने असा एकुण २,४०,५००/- या मुद्देमाल घेतला व पुन्हा पैश्याची मागणी करून सोशल मिडीयावर पाठलाग केला व पैसे न दिल्यास बदनामी करण्याची धमकी दिली.. याप्रकरणी फिर्यादी हिने दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे मानकापूर येथे पोउपनि, देशमुख यांनी आरोपीविरुद्ध कलम ३८६ ३५४(४) २९४, ५०६ (२) भा.दं.वि. सहकलम १२ पोक्सो अन्वये गुन्हा नोंदवून आरोपीचा शोध घेवून आरोपीस अटक केली आहेत. पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

फसवणुक करणाऱ्या आरोपीविरूध्द गुन्हा दाखल

Sat Aug 19 , 2023
नागपूर :- फिर्यादी रितेश मारोती बेलखोडे वय ३८ वर्ष रा. प्लॉट न. १०१ मिनीमाता नगर, कळमणा, नागपूर यांचे नंदनवन हद्दीत आर.एम. एन्टरप्रायजेस नावाचे हार्डवेअरचे दुकान आहे. तसेच फिर्यादी यांचा व्यापारी बिजनेस नेटवर्किंग व्हाट्सअॅप ग्रुप आहे. समुद्र ग्रुप मधे आरोपी ओमकार महेन्द्र तलमले वय २५ वर्ष रा. शाहु ले आउट, दत्तवाडी, सुद्धा सदस्य असल्याने फिर्यादीची आरोपी सोबत ओळखी होवुन बोलचाल होती. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com