नागपूर :- पोलीस ठाणे यशोधरानगर हहीत, रमाई बुध्द विहारा जवळ, कांजी हाऊस चौक, नागपूर येथे राहणारे फिर्यादी नामे लक्ष्मीकांत हरीचंद्र सोनकुसरे, वय ४९ वर्षे यांनी त्यांची होन्डा स्प्लेंडर मोटरसायकल क. एम.एच ४९ बी.यू ९५४७ किंमती ५०,०००/- रू ची ही आपले घराचे बाजुला पार्क करून, लॉक करून ठेवली असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली अशा फिर्यादी यांनी दिलेल्या तकारीवरून पोलीस ठाणे यशोधरानगर येथे अज्ञात आरोपीविरूध्द कलम ३७९ भा.दं.वी अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता.
गुन्हयाचे तपासादरम्यान यशोधरानगर पोलीसांनी मिळालेल्या माहितीवरून आरोपी आर्यन मदन मेश्राम वय २० वर्ष रा. पाण्याचे टाकीजवळ, ताजेश्वर नगर, हुडकेश्वर, नागपूर यास ताब्यात घेवुन विचारपूस केली असता, त्याने नमुद गुन्हा केल्याचे कबुल केले. त्यास अधिक सखोल विचारपूस केली असता त्याने आजपासुन अंदाजे दोन महिनेपुर्वी ऑटोमोटीव्ह चौकातील मेट्रो स्टेशन जवळून अॅक्टीव्हा गाडी क. एम.एच ४९ ब्रेड २८६२ ही चोरी केल्याचे सांगीतले. आरोपीचे ताब्यातुन गुन्हयात चोरी केलेले दोन्ही वाहन जप्त करण्यात आले.
वरील कामगिरी पोलीस आयुक्त, नागपुर शहर, सह पोलीस आयुक्त, नागपुर शहर, पोलीस उप आयुक्त (परि क. ५), सहायक पोलीस आयुक्त (जरीपटका विभाग) यांचे मार्गदर्शनाखाली वपोनि, भेदोडकर, सपोनि. विलास मोते, पोउपनि, राहुल राठोड, पौहवा. किशोर देवांगन, राहुल बोन्द्रे, पोअं. संदीप वानखेडे, प्रफुल चिंतले, मनिष डारकर, सितेश चौरसिया यांनी केली.