राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्या दिनदर्शिकेचे लोकार्पण

मोतीराम रहाटे, प्रतिनिधी

– माजी उपमहापौर मनिषा कोठे यांचे हस्ते. 

कन्हान (नागपुर) : – शिक्षणाशिवाय देशाच्या सर्व विकास होऊ शकत नाही म्हणुन शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना करून ग्रामिण भागात सर्वात जास्त शिक्षण संस्थान निर्माण केल्या ते संसार सदस्य कृषी मंत्री शेतकऱ्यांच्या कैवारी व खरे शिक्षण महर्षी होते आपण सुद्धा भाऊसाहेब डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या आदर्श डोळ्या समोर ठेवुन वाटचाल करावी असे प्रतिपादन संजय निंबाळकर यांनी केले. ते राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्या वतीने आयोजित डॉ. पंजाबराव देशमुख जयंती व डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद दिनदर्शिकेच्या लोकार्पण कार्यक्रमा प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन बोलत होते.

अध्यक्षपदी परमेश्वर राऊत शहराध्यक्ष ओबीसी महासंघ, प्रमुख अतिथी शेख अयाज अध्यक्ष पुर्व संजय निराधार योजना,  सुनिल कोठे सामाजिक कार्यकर्ते, डॉ पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे राज्य उपाध्यक्ष शांताराम जळते, डिस्ट्रिक्ट शाळा कर्मचारी पतसंस्थेचे माजी अध्यक्ष विनायक इंगळे गुरुजी, जिल्हाध्यक्ष माजी प्राचार्य नंदलाल यादव, जिल्हा प्रवक्त प्रमोद कडुकर, विभागीय महिला संघटना हर्षा वाघमारे आदीच्या प्रमुख उपस्थितीत माजी उपमहापौर मनिषा कोठे यांचे हस्ते डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद दिनदर्शिकेच्या लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी शांताराम जळते, हर्षा वाघमारे व प्रमुख अतिथी योगेश कडु यांनी भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जीवनावर व शिक्षकांच्या आंदोलनावर प्रकाश टाकला. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मेघराज गवखरे जिल्हाध्यक्ष यांनी केले. माजी प्राचार्य नंदलाल यादव व विनोद चिकटे सचिव यांनी संचालन तर लोक्कोतम बुटले यांनी आभार व्यकत केले. कार्यक्रमास विनोद चिकटे अविनाश श्रीखंडे, लोकोत्तम बुटले, पत्रकार प्रमोद गाडगे, जवाहर गुरुकुल इंगिल्स हायस्कुल चे प्राचार्य संजय रक्षीये, व विलास मांडवे हयानी विशेष सहकार्य केले.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com