वाहन चोरी करणाऱ्या आरोपीस अटक, ०४ गुन्हे उघडकीस, एकूण १,१०,०००/- रू. चा मुद्देमाल जप्त

नागपूर :- पोलीस ठाणे सिताबर्डी हद्दीत रामदासपेठ, पुष्पकुंज अपार्टमेंट येथे फिर्यादी प्रविण धनश्याम चौबे, वय ३५ वर्ष, रा. प्लॉट नं ४० मातोश्री नगर, वानाडोंगरी यांनी त्यांची हिरो स्प्लेंडर प्रो क. एम. एच. ४० ए.जि ४४०२ ही लॉक करून हॉस्पीटल मध्ये गेले असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्याची मोटरसायकल किमती अंदाजे २०,०००/- ची चोरून नेली. अशा फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पो. ठाणे सिताबर्डी येथे अज्ञात आरोपी विरुद्ध कलम ३७९ भादवि अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता. सदर गुन्हयाचे तपासात पो. ठाणे सिताबर्डी चे अधिकारी व अंमलदार यांना मिळालेल्या खात्रीशीर माहीतीवरून पेट्रोलीग दरम्यान मिठानिम दर्गाह जवळ सापळा रचुन आरोपी अल्केश दारू उईके, वय २५ वर्षे, रा. ग्राम हिवरा, ता अटनेर, जि. बैतुल, मध्य प्रदेश यास ताब्यात घेवून त्याचे जवळील वाहनाबाबत विचारपुस केली असता, आरोपीने वर नमुद गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपीस नमुद गुन्हयात अटक करण्यात आली. आरोपीस सखोल विचारपुस केली असता. आरोपीने १) पो. ठाणे वरुड, जि. अमरावती येथून काळया रंगाची हिरो स्प्लेंडर, निळे पट्टे असलेली, एन. एच २७ बीज ३८८५ किमती २२,५००/- २) पोलीस ठाणे वाठोडा हद्दीतून एक काळया रंगाची होंडा शाइन क एम.एच ३६ एम ११५९ किमी २२,५००/-रु ३) पोलीस ठाणे कळमेश्वर हद्दीतून एक काळया रंगाची होंडा साईन एम. एच. ४० ए.एन ०४८९ किमती २२,५००/- तसेच एक सिल्व्हर रंगाची स्पलेंडर मोटरसायकल नंबर नसलेली किमती २२,५००/- रु ची असे वाहने चोरी केल्याची कबुली दिली. आरोपीकडुन गुन्हयातील चोरी केलेली एकुण ५ वाहने, किमती १,१०,०००/- रु चा मुद्देमाल जप्त करून एकुण चार गुन्हे उघडकीस आणलेले आहे. वरील कामगिरी पोलीस उपायुक्त परी क्र. ०२ सपोआ. सिताबर्डी विभाग यांचे मार्गदर्शनाखाली वपोनी अतुल सबनिस, पोनि गुन्हे विश्वनाथ चव्हाण, सपोनि संतोष कदम, पोउपनि विनोद तिवारी, कैलास मगर, पोअ धिरज देशमुख, गणेश रंभापूरे यांनी केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

बँकेत चोरीचा प्रयत्न करणाऱ्या महिला आरोपीस अटक

Sat Jul 1 , 2023
नागपूर :- फिर्यादी राजेश राजन चाक्कल वय ५८ वर्ष, रा. प्लाट नं. ३०२ संताजी सोसायटी, बेलतरोडी, नागपुर, हे मागील तिन वर्षांपासून नायर कंपनी येथे सर्विस डिपार्टमेंट मध्ये काम करतात. कंपनीचे बैंक अकाउंट पंजाब नॅशनल बैंक, किंग्जवे सदर येथे आहे. फिर्यादी हे दिनांक ३०.०६.२०२३ चे १२.१५ वा. चे सुमारास कंपनीचे पैसे काढण्या करीता बँकेत आले व त्यांनी दोन लाख रूपये काढून […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!