नागपूर :- पोलीस ठाणे अजनी हद्दीत, नाईक नगर, संजय बांगडेचे घरा समोर, फिर्यादी शेख रमजान शेख मजीद पठाण वय ५५ वर्षे, ग. प्लॉट नं. ३५, बेसा ग्रामपंचायत जवळ, बेलतरोडी, नागपूर यांनी त्यांची हिरो होन्डा स्प्लेंडर मोटरसायकल क. एम.एच ३१ ए.एस ६४५१ किंमत्ती २०,०००/- रू ची, लॉक करून पार्क करून ठेवली असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे वाहन चोरून नेले. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे अजनी येथे अज्ञात आरोपीविरूध्द कलम ३०३(२) भा.न्यां.सं. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हयाचे तपासात अजनी पोलीसांनी पेट्रोलींग दरम्यान दिनांक २७.०७.२०२४ रोजी गुप्त बातमीदाराकडुन मिव्यलेल्या माहीतीवरून पंच्याशी प्लॉट एरीया जवळ एका संशयीत ईसमास थांबवून त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने आपले नाव यश विजय गहूकर, वय १९ वर्षे रा. बजरंग नगर, गल्ली नं. ५, अजनी, नागपूर असे सांगीतले. त्याला त्याचे जवळील वाहनाचाचत विचारपूस केली असता, त्याने वर नमुद गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यास गुन्हयात अटक करण्यात आली. आरोपीला अधिक सखोल विचारपूस केली असता, त्याने वरील गुन्ह्याव्यतीरीक्त पोलीस ठाणे अजनी हद्दीतुन एक सायकल चोरी व एका घरातुन मोवाईल चोरी केल्याची कबुली दिली. आरोपीचे ताब्यातुन एकुण ०३ गुन्हे उघडकीस आणलेले असुन एकुण ७५,०००/-रू, चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
वरील कामगिरी पोलीस उप आयुक्त (परि. क. ४), सहा, पोलीस आयुक्त (अजनी विभाग) यांचे मार्गदर्शनाखाली, वपोनि. किरणकुमार कवाडी, पोनि. लक्षमण केन्द्रे, पोउपनि. अंकीत आंबेपवार, पोहवा, ओमकार बाराभाई, नापोअं. प्रकाश गाडेकर, पोअं. अतुल टिकले, राहुल शेंडे, मनिष भलमे, नितीन सोमकुवर, अश्विन सहारे, नरेश श्रावणकर, रोशन वाडीभसमे, हिमांशू पाटील व कुणाल उके यांनी केली.