वाहन चोरी करणाऱ्या आरोपीस अटक, ०२ गुन्हे उघडकीस

नागपूर :- फिर्यादी रविंद्र गंगाराम खंडारे, वय ५२ वर्षे, रा. ज्योती नगर, पाचपावली, नामपुर हे पोलीस ठाणे पाचपावली ह‌द्दीत पार्वती टॉवर बिल्डींग, इंदोरा चौक, कामठी रोड, नागपुर येथे ईलेक्ट्रीकल काम करण्यास गेले होते. त्यांनी त्यांची आयस्मार्ट मोटारसायकल क. एम एच. ४९ आर. ६५९८ किंमती अंदाजे ३५,०००/- रु. ची पार्क करून हॅन्डल लॉक करण्यास विसरले होते. कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीची मोटारसायकल ठेवलेल्या ठिकाणाहुन चोरून नेली. फियांदी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे पाचपावली येथे अज्ञात आरोपीविरूष्ट कलम ३७९ भा.द.वी. अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता.

गुन्हयाचे तपासात पोलीस ठाणे पाचपावली येथील तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी तांत्रीक तपास करून मिळालेल्या खात्रीशीर माहीतीवरून, सापळा रचुन आरोपी बादल उर्फ गुंडर संजय राऊत, वय ३१ वर्षे, रा. आदर्श नगर, पाचपावली, नागपुर यास ताब्यात घेवुन, विचारपुस केली असता, त्याने वर नमुद गुन्‌ह्यातील वाहन चोरी केल्याची कबुली दिली. आरोपीस नमुद गुन्हयात अटक करण्यात आली. आरोपीचे ताब्यातुन आयस्मार्ट मोटारसायकल क. एम.एच. ४९ आर. ६५९८ किंमती अंदाजे ३५,०००/- रु. ची जप्त करण्यात आली तपासादरम्यान आरोपीस अधिक सखेल विचारपूस केली असता, त्याने नमुद गुन्हयाव्यतीरिक्त पोलीस ठाणे नवि कामठी हद्दीतुन ग्रे रंगाची होंडा शाईन दुचाकी क. एम. एच ४० मि.टी. ०१७७ किंमती ५०,०००/- रु. ची चोरी केल्याची कबुली दिली. आरोपीकडुन ०२ गुन्हे उघडकिस आणुन त्याचे ताब्यातुन एकुण ८५,०००/- रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पुढील तपास सुरू आहे

वरील कामगिरी पोलीस आयुक्त नागपूर शहर, सह पोलीस आयुक्त नागपूर शहर, अपर पोलीस आयुक्त (उत्तर विभाग),  पोलीस उप आयुक्त (परि. क. ३), सहा. पोलीस आयुक्त (लकडगंज विभाग) यांचे मार्गदर्शनाखाली, यपोनि बाबुराव राऊत, सपोनि प्रविण सोमवंशी, पोहवा ज्ञानेश्वर भोगे, नापीअं ईमरान शेख, रोमेश मेनेवार, राहुल चिकटे, पोभं गगन यादव, संतोष शेंद्रे व महेंद्र शेलोकार यांनी केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

तांत्रिक बिघाडामुळे नागपूर मेट्रो सेवेत आज संध्याकाळी व्यत्यय

Sat Jul 6 , 2024
नागपूर :- नागपूर मेट्रोच्या सीताबर्डी इंटरचेंज मेट्रो स्टेशन जवळ OHE (ओव्हर हेड इक्विपमेंट) संबंधित झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे त्या मार्गिकेवरील सेवा आज संध्याकाळी ६.३० ते ७.३० दरम्यान बंद होती. तांत्रिक बिघाडामुळे सेवा बंद पडल्याने नागपूर मेट्रोच्या प्रवाश्यांची गैरसोय झाली. त्यामुळे खापरी आणि ऑटोमोटिव्ह चौक दरम्यान मॅरो मार्गिकेवरील सेवा प्रभावित झाली. बिघाड समजल्यावर नागपूर मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी तातडीने पाऊले उचलली. मिहान डेपो येथून […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!