वाहन चोरी करणाऱ्या आरोपीस अटक

नागपूर :- पोलीस ठाणे मौदा, नागपुर ग्रामीण हद्दीत शिवाजी चौक, जुनी ग्रामपंचायत, महालगाव, तह. कामठी, जि. नागपूर येथे राहणारे फिर्यादी अचित दिलीप तिवाडे, वय २६ वर्षे यांनी त्यांची मोटरसायकल क. एम एच. ४०, सि.जी. ८९७२ किंमती २५,०००/- रू. यी पराचे अंगणात हॅन्डल लॉक करून, पार्क करून ठेवली असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हेशाखा युनिट क. ३ चे अधिकारी व अंमलदार यांनी पेट्रोलींग दरम्यान मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून सापळा रचून एका १५ वर्षीय विधीसंगर्षग्रस्त बालक यास ताब्यात घेवून विचारपूस केली असता, त्याने त्याचा मध्यवर्ती कारागृहात बंदीस्त असलेला साथीदार नामे हर्ष उर्फ छोटु डेहरीया, वय १९ वर्षे, रा. इंदीरा माता नगर, यशोधरानगर, नागपुर यासह मिळुन नमुद वाहन चोरीचा गुन्हा केल्याचे कबुल केले, विधीसंघर्ष बालकाचे ताब्यातुन सिल्वार बाँक रंगाची हिरो कंपनीची क. मोटरसायकल एम एच. ४०, सि.जी. ८९७२ किंमती २५,०००/- रू जप्त करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.

वरील कामगिरी अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन) यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि बजबळकर, पोउपनि देवकाते, सफी खोरडे, चौधरी, पोहवा राऊत, लांडे, तायवाडे, नापो गायकवाड, जासूद, पोअं. रामटेके व संतोष यांनी केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

घरफोडी करणाऱ्या आरोपींना अटक

Thu Feb 22 , 2024
नागपूर :- पोलीस ठाणे हुडकेश्वर हद्दीत एलॉट नं. ९२. माऊली नगर, उत्कर्ष सोसायटी, पिपळा फाटा रोड, नागपुर येथे राहणारे फिर्यादी शुभम वसंतराव बव्हाण, वय २९ वर्षे हे आपले घराला कुलूप लावून बाहेर गेले असता, कोणीतरी अज्ञात चोरट्‌याने फिर्यादीचे घराचे मुख्यदाराचे कुलूप तोडुन, घरात प्रवेश करून, बेडरूम मधील आलमारीतुन रोख ४०,०००/- रू. व सोन्या-चांदीचे दागिने असा एकुण १,८०,०००/-रु. या मुद्देमाल चोरून […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com