चोरी करणारे आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळयात

नागपूर :- फिर्यादी नामे ऋषी गोपाल अग्रवाल, वय २४ वर्ष, रा. गणेश नगर कन्हान हे घरी हजर असता फिर्यादी यांना त्यांच्या साईडवरील ठेकेदाराने फोन करून माहिती दिली की, साईडवरील १) एक कॅमेरा सौपी प्लस कंपनीचा २) सॅमसंग कंपनीचा मोवाईल एम २१ ३) जिओ किपॅड मोबाईल ४) लोखंडी सळाखे १०० किलो असा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात आरोपीने चोरी करून नेला आहे. अशा फिर्यादीचे रीपोर्ट वरून पोस्टे कन्हान येथे अप. क्र. ३९२/२४ कलम ३७९ भादाँव, अन्वये गुन्हा नोंद केला आहे.

दि. ४/०६/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कन्हान उपविभागात पो.स्टे. कन्हान येथील अप. क्र. ३९२/२४ कलम ३७९ भादंवी गुन्ह्याच्या समांतर तपास करीत असताना मिळालेल्या गुप्त खचरे वरून संशयित इसम नामे- निखिल मारोति ढोवले, वय २४ वर्ष, रा. शिव नगर कन्हान जि. नागपूर यास ताब्यात घेऊन सखोल विचारपूस केली असता उडवाउडविचे उत्तरे दिली. अधिक विचारपुस दरम्यान त्याने दि. ०५/०४/२०२४ रोजी रात्रीला अंदाजे दोन वाजेच्या सुमारास तारसा रोड कन्हान लागून नवीन इमारतचे काम सुरू असलेल्या ठिकाणी जाऊन चोरी केल्याची कबुली दिली त्याचे ताब्यातून एक सी सी टीव्ही केमेरा किंमती १५००/- रू. एक किपेड मोबाईल किंमती १५००/- रू. एक अॅनरोइड मोबाईल ६,०००/-रू असा एकूण ९०००/- रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त मुद्देमाल व आरोपी पुढील कायदेशीर प्रक्रिये करीता पोलीस ठाणे कन्हान यांचे ताब्यात देण्यात आले.

सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोदार (भापोसे), अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक  ओमप्रकाश कोकाटे, पोउपनि बहुलाल पांडे, ASI. नाना राउत, पोहवा विनोद काळे, पोहवा इकबाल शेख, पोहवा प्रमोद भोयर, नापोशि संजय वरोदिया, नागोहवा मोनु शुक्ला गांनी पार पाडली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विधानसभेत महायुतीचा झेंडा फडकेपर्यंत थांबणार नाही - आमदारांच्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्धार

Sat Jun 8 , 2024
मुंबई :- लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी केलेला खोटा प्रचार फार दिवस टिकणारा नाही.विरोधकांच्या अपप्रचाराला योग्य उत्तर देऊन विधानसभा निवडणुकीत महायुतीचा झेंडा फडकविल्याखेरीज मी थांबणार नाही, असा निर्धार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी व्यक्त केला. भाजपा आमदारांच्या बैठकीत फडणवीस बोलत होते. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, वन व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार,मुंबई अध्यक्ष आ.आशीष शेलार, प्रदेश सरचिटणीस आ. रणधीर सावरकर, आ.प्रवीण दरेकर आदी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com